बापरे..बायकोकडून नवऱ्यावर अन्याय होत असल्याचे होतात वर्षभरात २५०० तक्रारी..
पुरुषांवरील देखील अन्यायाच्या घटना पाच-पन्नास घडत असल्याचे दिसते,त्यामुळे पुरुषांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये पुरुष हक्क संरक्षण समिती कार्यरत आहे, वर्षभरात प्रत्येक जिल्हा कार्यालयात २५०० तक्रारी दाखल होतात. रोज किमान ४०० ते ५०० जण नाव न सांगता
किंवा खोटे नाव सांगून त्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाची तक्रार सांगून सल्ला विचारतात अशी माहिती अशी माहिती पुरुष हक्क संरक्षण समितीचे ॲड. बाळासाहेब पाटील,ॲड. धर्मेंद्र चव्हाण यांनी दिली. तसेच पुरुष हक्क संरक्षण
समितीचे राष्ट्रीय अधिवेशन २९ डिसेंबर रोजी धुळे येथे होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.जगभरात १९ नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष दिन साजरा होतो. पुरुष हक्क संरक्षण समिती ०७ नोव्हेंबर १९९६ रोजी नाशिक येथे स्थापन झाली. तिच्या राज्यभरात ३६ शाखा
आहेत. देशात पुरुष हक्क आयोगाची स्थापना करण्याची समितीची मागणी आहे. जुलमी आणि व्याभिचारी स्त्रीच्याअत्याचारास बळी पडलेल्या पुरुषांना मानसिक आणि कायदेशीर आधार/सल्ला देण्याचे काम ही समिती करते.शहरी भाग आणि ग्रामीण भागातील पुरुषांवर होणाऱ्या
अत्याचाराचे स्वरूप वेगवेगळे आहे. शहरात पुरुषांवर अन्याय होण्यासाठी विभक्त कुटुंब पध्दती आणि मोबाईलचा वापर, आर्थिक तफावत या बाबी कारणीभूत ठरतात, तर ग्रामीण भागातील पुरुषांवर अन्याय करण्यात महिलांना सहाय्य करणाऱ्या नातेवाईकांचा घरात अति
वावर, पैशाचा अभाव कारण ठरते.
बायकोकडून नवऱ्याचा छळ होतो ही बाबच समाजाला मान्य नाही. त्यामुळे तक्रारी दाखल करताना देखील पुरुषांना अधिक त्रास होतो. किंवा ते नाव न सांगता तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या पुरुषांना जाच
करण्याचे कारण मोबाईल ठरत आहे. संशयाचे कारण निर्माण झाल्यावर अधिक छळवणूक केली जाते.मोबाईलवर सतत पाळत ठेवणे, आर्थिक स्वातंत्र्य न देणे,उपाशी ठेवणे असे प्रकार पुरुषांबाबत घडतात. याची वाच्यता केल्यास कुटुंबाची बदनामी होईल, मुलांना त्रास होईल या भीतीने पुरुष तक्रार करण्यास टाळाटाळ करतात.
महिला जाच सहन करतात, प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून अत्याचार सहन करतात. त्याप्रमाणे पुरुषही महिलांकडून अन्याय होत असेल तेव्हा कुटुंबाचे हाल होऊ नयेत म्हणून अत्याचार सहन करत राहतात, अशी माहिती पुरुष हक्क
संरक्षण समितीचे अॅड. बाळासाहेब पाटील, अॅड धर्मेंद्र चव्हाण यांनी दिली. शहरात मोबाईल हे साधन पुरुषांच्या हक्कांवर गदा आणत आहे. मोबाईल संवाद, व्हॉट्सअॅप संवादातून गैरसमजुती, क्रॉसचेक यातून संशयाचे वातावरण
वाढून पुरुषांवर अत्याचार केले जातात. मग ते शारीरिक,मानसिक, सामाजिक शिक्षेच्या स्वरूपात असतात. पुरुषांचे इकॉनॉमिकल फ्रस्ट्रेशन हा गंभीर मुद्दा महिलांकडून अधिक
प्रभावीपणे सार्वत्रिक केला जातो. त्यामुळे पुरुषाचे जगणे असह्य होते. अशाही केसेस दाखल होत आहेत. विभक्त कुटुंब पध्दतीमुळे पती-पत्नीत क्षुल्लक कारणांवरून वाद
होतात आणि त्यावरून पुरुषांना जाच होण्याचे प्रमाणही वाढत आहे.दरवर्षी डिसेंबरमध्ये पुरुष हक्क संरक्षण समितीचे राष्ट्रीय अधिवेशन होते आणि तिथे पुरुषांचे प्रश्न सोडविण्यासाठी
प्रयत्न होतात. यंदा धुळे येथे २९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पुरुष हक्क समितीचे सल्लागार तेथे दाखल होतात. तक्रारदार पुरुषांना सल्ला, मार्गदर्शन करून कुटुंबांचे स्थैर्य टिकवण्याचे प्रयत्न केले जातात.पाच-सहा वर्षे प्रेम प्रकरण आणि एकत्र राहूनही नंतर मात्र बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्याचे आयुष्यच
पणाला लागते. आई-वडिलांच्या संमतीने लग्न केले. मात्र बायको चार दिवसानंतर प्रियकराबरोबर पळून गेली.त्यामुळे याचे लग्न मोडले, आता स्थळेच मिळत नाहीत.
आई वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देते म्हणून जाब विचारताच बायको नवरा आणि त्याच्या माणसांना उपाशी ठेवते, मारहाण करते, आई वडिलांबरोबर राहू देत नाही म्हणून याला नैराश्य आले आहे. अशा शेकडो तक्रारी रोज
दाखल होत असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment