स्मशानभुमी मधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची उत्तम कामगिरी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, November 25, 2024

स्मशानभुमी मधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची उत्तम कामगिरी...

स्मशानभुमी मधील लाकडावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची उत्तम कामगिरी...
वालचंदनगर:- दिनांक १६/११/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा सुमारास मौजे तावशी, ता. इंदापुर, जि. पुणे गावचे हद्दीमधील स्मशानभुमी मध्ये लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असुन त्याच्या कडेल जास्त प्रमाणात रक्त पडलेले आहे अशी माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे तावशी पोलीस पाटील यांचेकडुन प्राप्त झाली. त्यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे व इतर
पोलीस स्टाफ यांनी तात्काळ घटनास्थळी जावन पाहणी केली असता तावशी स्मशानभुमीतील लोखंडी जाळीवर पुर्णपणे जळालेले हाडे तसेच पुर्व बाजुस ४० फुट अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. तसेच लोखंडी जाळीच्या बाजुस जळालेली लाकडे व इतर लाकडे दिसत होती. परंतु त्यावेळी त्याठिकाणी नेमके काय जळाले आहे याबाबत कोणताही बोध होत नव्हता. त्यावेळी घटनास्थळी घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा बारकाईने पाहणी करत असताना त्याठिकाणी प्राथमिकदृष्टया हा घातपाताचा प्रकार दिसुन येत असल्याने
पोलीस स्टेशन येथे स्टेशन डायरीस नोंद करुन पुढील तपास सुरू केला.सदर घडलेल्या घटनेची माहिती मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण व मा. श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधिकारी, बारामती विभाग, मा. श्री. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांना दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे वालचंदनगर पोलीस
स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन इंदापुर, माळशिरस व फलटण तालुक्यामध्ये जावुन तांत्रिक व गोपनीय बातमीदार यांच्या करवी तपास केला परंतु काही एक माहिती उपल्बध होत नव्हती.स्मशानभुमी मध्ये मिळुन आलेले जळके व शिल्लक लाकडे ताब्यात घेवुन ती कोणत्या वखारीमधील आहेत
याचा तपास करत असताना सदरची लाकडे ही गुणवरे, ता. फलटण येथील वखारीमधील असल्याची दिनांक १८/११/२०२४ रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार तपास करत असताना गुणवरे ता.फलटण येथील वखारीतुन इसम नामे दादासाहेब मारुती हरिहर वय ३० वर्षे रा. गोखळी,ता. फलटण, जि. सातारा व त्याचा मित्र नामे विशाल सदाशिव खिलारे वय २३ वर्षे रा. गोखळी,ता.फलटण, जि.सातारा यांनी लाकडे खरेदी करुन मयताच्या अंत्यविधी करीता वाहनांमध्ये घेवुन गेल्याचे सांगितले. त्याप्रमाणे नमुद दोन्ही इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता दोन्ही इसमांनी गंगाखेड, जि. परभणी येथील जगताप मामा याचा आरोपी क्रमांक ०१ याच्या बायकोवर वाईट
नजर असल्याच्या कारणावरुन दोन्ही आरोपीतांनी कट रचुन मयतास गंगाखेड येथुन सतोबाची यात्रा,टाकेवाडी, ता. माण, जि. सातारा येथे जेवण करण्याच्या निमित्ताने सोबत घेवुन येवुन दिनांक १५/११/२०२४ रोजीच्या मध्यरात्री मौजे तावशी, ता. इंदापुर येथील स्मशानभुमी जवळ लघवीला म्हणुन गाडी थांबवुन मयत इसमाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण त्यास जिवे ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या
उद्देशाने मयतास स्मशानभुमी मध्ये जाळले आहे.
त्यानंतर आरोपीकडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेवुन
मयताची ओळख पटवुन मयताचे नाव हरिभाऊ धुराजी जगताप, वय - ७४ वर्षे रा. गंगाखेड, परभणी असे असल्याचे निष्पण झाले. मयताचे नातेवाईक नामे सचिन हरिभाऊ जगताप, वय - ४६ वर्षे, रा. सध्या कोल्हापुर यांना याबाबत सविस्तर माहिती देवुन त्यांची घडलेल्या प्रकाराच्या अनुषंगाने लेखी फिर्यादी घेवुन गु. रजि.नंबर ४९५ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ६१ (२), २३८,३(५) प्रमाणे वरील दोन्ही आरोपी यांचे विरोधात दिनांक १९/११/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास हा पोलीस उप-निरीक्षक मिलींद मिठापल्ली, वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हे करत असुन दोन्ही आरोपीतांची दिनांक २५/११/२०२४ राजी पोलीस कस्टडी मिळाली आहे.सदर घटनेमध्ये तावशी स्मशानभुमी मध्ये नक्की काय घटना घडली आहे याची पुर्णपणे शाश्वती नसताना तसेच त्याबाबत कोणाताही पुरावा नसताना केवळ स्मशानभुमी मध्ये मिळुन आलेल्या लाकडावरुन व तिथे पडलेल्या रक्तांवरुन घातपाताचा संशय बळावल्याने वालचंदनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय कौशल्यपुर्ण पध्दतीने तपास करुन सदरचा गुन्हा
उघडकीस आणुन उत्तम अशी कामगिरी केली आहे. याबाबत कामगिरी बाबत वालचंदनगर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.सदरची कामगिरी मा. श्री. पंकज देशमुख साो, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा.श्री. डॉ. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी,
बारामती उपविभाग, मा. श्री. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा विभाग, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार डुणगे, सहा. पोलीस निरीक्षक, कुलदीप संकपाळ, सहाय्यक
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तसेच बाळासाहेब कारंडे, सहाय्यक पोलीस फौजदार, शैलेश स्वामी, पोलीस हवालदार २११९, गुलाबराव पाटील, पोलीस हवालदार १४९५, गणेश काटकर, पोलीस हवालदार २०५३, अजित थोरात, पोलीस हवालदार १४१३, स्वप्नील अहिवळे, पोलीस हवालदार २०५७, अजय घुले, पोलीस हवालदार २१८९, निलेश शिंदे, पोलीस हवालदार २४१५, विक्रमसिंह जाधव, पोलीस
अंमलदार २०४, अभिजीत कळसकर, पोलीस अंमलदार ३१२ यांनी पार पाडली आहे.

No comments:

Post a Comment