बापरे.. जामीन देण्यासाठी मृत व्यक्तीच्या नावे दुसराच उभा;मिळाली सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा..
नाशिक : -कोण कुणाला फसवेल याचा नेम नाही येथे तर चक्क न्यायालयाला फसविले असल्याचे लक्षात आले, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी एकास सात वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टात मृत व्यक्तीच्या नावे दुस-यास उभे करून जामिन मिळवून दिशाभूल केली होती. हा प्रकार २०२२ मध्ये उघडकीस आला होता. याप्रकरणी
सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीस विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.मयुर राजेंद्र हिरावत (२५ रा. हिरावत चाळ सुदर्शन कॉलनी दत्तनगर पेठरोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरावत याच्या विरोधात २०२० मध्ये विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यात जामिन मिळविण्यासाठी त्याने गणपत भिका जाधव (रा. गंगापूरगाव ता.जि.नाशिक) या मृत इसमाचे कागदपत्र न्यायालयात सादर केले होते. सदर
इसम २ डिसेंबर २०१४ रोजी मयत झालेला असतांनाही हिरावत याने १५ डिसेंबर २०२० रोजी जाधव यांच्या नावे असलेला सातबारा उतारा आणि आधारकार्ड मिळवून एका
अनोळखी व्यक्तीस ८ वे सहदिवाणी न्यायाधिश व स्तर तथा अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात उभे करून स्व:ताचा जामिन मिळवला होता.न्यायालयाची दिशाभूल केल्याचा हा प्रकार समोर येताच २९ सप्टेंबर २०२२ रोजी याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक नितीन खैरणार यांनी केला.हा खटला मुख्य न्यायदंडाधिकारी एस.जी.बावकर यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे ॲड. विद्या देवरे - निकम यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार व पंच यानी दिलेली साक्ष व तपासी अधिकारी यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सात वर्ष सश्रम कारावास आणि २१ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
No comments:
Post a Comment