बापरे..नर्सवर आळीपाळीने बलात्कार करीत प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 29, 2024

बापरे..नर्सवर आळीपाळीने बलात्कार करीत प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर...

बापरे..नर्सवर आळीपाळीने बलात्कार करीत प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पावडर...
कानपुर:- महिला सुरक्षित नसल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, गॅंग रेप सामूहिक बलात्कार यामुळे माणुसकीला काळिमा फासले जात आहे, अश्या नराधमांना कायद्याच्या आधारे सत्यता तपासून कडक शिक्षा जागीच   देण्याची गरज आली आहे,नुकताच एक धक्कादायक घटना समोर आली आहे,३० वर्षांच्या एका नर्सवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर पीडितेने पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
पीडितेने पोलिसांना तिच्या वेदना सांगितल्यानंतर पोलीसही हादरुन गेले आहेत.या घटनेतील पीडिता नर्स ही स्कूटरवरुन रुग्णालयात ये-जा
करत होती. दरम्यान या घटनेचा जो प्राथमिक वैदकीय चाचणी अहवाल आला आहे त्यात नर्सवर बलात्कार झाल्याबाबत सकृतदर्शनी काही पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पीडित नर्सने तिच्या वेदना सांगितल्या आहेत. 
FIR मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने सांगितलं की गोविंद आणि राम मीलन नावाच्या दोन माणसांनी तिच्यावर बलात्कार  केला. पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या जयंतीदेवी यांनी या दोघांना असं करायला सांगितल्याचा आरोपही तिने केला. पीडितेने सांगितलं की या दोघांनी तिला जंगलात नेलं. त्यानंतर तिथे तिला
मारहाण केली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने सांगितलं की ती
आरडाओरड करु लागली तेव्हा बाजूच्या शेतांमध्ये काम करणारे काही शेतकरी तिच्या मदतीला धावले ज्यानंतर हे दोघं तिथून पळून गेले.कानपूरमधल्या एका गावातली ही घटना आहे.पीडितेने सांगितलं की जयंतीदेवी तिच्या घराच्या शेजारी राहते.बलात्काराच्या घटनेच्या एक दिवस आधी या दोघींमध्ये वाद झाला होता. जयंतीदेवी या दोघींमध्ये वाद झाला होता. जयंतीदेवी या महिलेला असं वाटलं होतं की तिच्या नवऱ्याचं आणि पीडितेचं अफेअर सुरु आहे. पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार ती चुरखी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका रुग्णालयात काम करते.गुरुवारी ती तिच्या स्कूटरवरुन रुग्णालयात जात होती तेव्हा
गोविंद आणि राम मीलन यांनी तिची वाट अडवली तिला जंगलात घेऊन गेले, शिवीगाळ, मारहाण केली आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही सगळी हकीकत पीडितेने तिच्या नवऱ्यालाही सांगितली. तिच्या नवऱ्याने हे पण सांगितलं की चार जणांनी पकडून तिला जंगलात नेलं होतं. दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या प्रायव्हेट
पार्टमध्ये काठी आणि मिरची पावडर टाकली. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातल्या दोघांना
ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची चौकशी करण्यात येते आहे. आत्तापर्यंत सामूहिक बलात्कार झाल्याचा पुरावा किंवा प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकल्याचा पुरावा
मिळालेला नाही. ज्यावेळी पूर्ण वैद्यकीय अहवाल मिळेल त्यावेळी त्यात काय नमूद आहे त्यावरुन आम्ही गुन्हा दाखल करु असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान नर्स आणि तिच्या पतीने नर्सवर सामूहिक बलात्कार झाल्याचं म्हटलं आहे अशी माहिती मिळाली.

No comments:

Post a Comment