बारामतीत मतदारांना धमकविल्या प्रकरणी अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 21, 2024

बारामतीत मतदारांना धमकविल्या प्रकरणी अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स..

बारामतीत मतदारांना धमकविल्या प्रकरणी अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स..
बारामती:-नुकताच बारामती  विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. आता २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी आली आहे. आता १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २०१४ विधानसभा निवडणुकीच्या मतदार संघातील हे प्रकरण आहे. बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार
यांनी धमकी दिली होती. त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही बारामती तालुक्यातील मासाळवाडी या गावामध्ये अजित पवार गेले होते. त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असे अजित पवार यांनी म्हटले होते.आता अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स आले
आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावच पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी आवाहन करत
होते. प्रचार करत होते. परंतु दहा वर्षानंतर कोर्टात सुनावणीस आलेल्या या प्रकरणात आता बरेच बदल झाले आहे.

No comments:

Post a Comment