12 डिसेंबर रोजी लोकनायक कै.खा. गोपीनाथ मुंडे यांची 75 वी जयंती साजरी..
बारामती:-12 डिसेंबर रोजी स्वर्गीय लोकनायक मा. श्री.खा.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या वाढदिवस व 75 व्या जयंतीनिमित्त बारामतीत मिशन बोर्डिंग मध्ये खास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.भारतीय जनता पार्टीचे सुरेखा गर्जे व मित्र परिवाराच्या वतीने बोर्डिंग मध्ये मुलांना खाऊ वाटप करून जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, वादग्रस्त साप्ताहिकाचे संपादक संतोष जाधव, तसेच सामाजिक कार्यकर्त्या रसिका पंडित,सुरेश पंजाबी उपस्थित होते.मान्यवरांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून दिली आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमादरम्यान, मुंडे साहेबांच्या विचारसरणीचा प्रचार व प्रसार करत नवीन पिढीपर्यंत त्यांचे कार्य पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. अनाथ आश्रमातील मुलांना खाऊवाटप त्यांच्यासोबत संवाद साधण्यात आला,दर वर्षी विवीध उपक्रमाने मुंडे साहेबांचा वाढदिवस(जयंती)साजरी करीत असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment