धक्कादायक..मुख्याध्यापकचे कृत्य;14 मुलींचा विनयभंग.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 1, 2024

धक्कादायक..मुख्याध्यापकचे कृत्य;14 मुलींचा विनयभंग..

धक्कादायक..मुख्याध्यापकचे कृत्य;14 मुलींचा विनयभंग..
लातूर:- शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचे काम नुकताच मराठवाड्यात घडली आहे. लातूरमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य शाळेच्या मुख्याध्यापकाने केला आहे. एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने त्याच्याच शाळेत शिकणा-या 14 मुलींचा
विनयभंग केला आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुलींचे
पालक संतप्त झाले आहेत.या प्रकरणी लातूर शहरातील MIDC पोलीस ठाण्यात पोलिसांनी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला
आहे. या निंदनीय घटनेची गंभीर दखल घेत, संबंधित मुख्याध्यापकाला तातडीनं निलंबित करण्यात आलं आहे.या घटनेमुळे शालेय विद्यार्थीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पिडीत मुलींनी पालकांकडे याची तक्रार केली. यानंतर पालकांनी शाळेतील शिक्षकांकडे याबाबत विचारणा केली.गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली.
यानंतर शाळेत विशाखा समिती स्थापन करण्यात आली.समितीमार्फत पिडीत विद्यार्थीनींच्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकानेच मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस
आले. यानंतर या मुख्याध्यापकाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच या शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment