राधेश्याम एन. आगरवाल टेक्नीकल हायस्कुल बारामती येथे 15 डिसेंबर रोजी 'माजी विद्यार्थी मेळावा'..
वृध्दींगत होतो गाठी-भेटीने चला साजरा करू, क्षण हा आनंदाचा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा..या उपक्रमा अंतर्गत सन १९७९ ते १९८२ या कालावधीतील म्हणजे ४५ वर्षापूर्वी राधेश्याम एन. आगरवाल टेक्नीकल हायस्कुल बारामती, जि. पुणे या ठिकाणी इ. १०वी / इ.
१२वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एकत्र येवून " माजी विद्यार्थी संघटना " स्थापन केली आणि त्यातून आपण मिळून समाजाप्रती किंवा आपल्या शाळेकरिता आपल्या ज्ञानाचा,अनुभवाचा काही फायदा आजच्या विद्यार्थ्यांना करून देता येईल कां? या उद्देशाने" माजी विद्यार्थी मेळावा" घेण्याचे निश्चित करण्यात आले. राधेश्याम एन. आगरवाल टेक्नीकल हायस्कुल बारामती येथे दिनांक
रविवार दि. १५/१२/२०२४ या दिवशी 0विद्यालयात होणार आहे. आज माजी विद्यार्थ्यांनी ६० वर्ष वयाची पूर्ण केली असल्याने पुन्हा एकदा ४५ वर्षांनी भेटून आपले पुढील भावी आयुष्य चांगल्या रितीने, आनंदाने, जुन्या आठवणींना उजाळा मिळावा आणि जुने मित्र भेटणार, पुन्हा शाळा भरणार परंतु त्याला घंटा नसणार, त्यावेळचे शिकविणारे शिक्षक सुध्दा आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी करणेकरिता कल्याणराव तावरे, सुनिल गायकवाड, रमेश स्वामी, इक्बाल तांबोळी, सतिश सातव,पोपट कुलथे यांच्या सहभागातुन या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे
1इक्बाल तांबोळी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment