नशेचे इंजेक्शन विक्री करणारी महिला अटक; पोलिसांकडून 160 बाटल्या जप्त..
पुणे :- सद्या नशा करण्यासाठी तरुणांई कोणत्याही थराला जाण्याची तयारी दिसत असल्याचे व त्यातुन गुन्हेगारी कडे वळत असल्याचे दिसत आहे,असे नशा करण्यासाठी लागणारे साहित्य मग ते वेगवेगळ्या स्वरूपात असते, त्यातच नशा करण्यासाठी इंजेक्शन वापरले जाते.अश्याच नशेच्या इंजेक्शन विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केलीय, याबाबत मिळालेली माहिती अशी की, नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेन्टरमाइन
सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला हडपसर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन 400 ते 500
रुपयांना विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंग ठाकुर, (वय 26, रा.माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी सदर महिलेकडून 1 लाख रुपयांची मेफेन्टरमाइन सल्फेट (टर्मीन) च्या 160 बाटल्या जप्त केल्याची माहिती हडपसर
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली
की, एक महिला नशा करण्यासाठी इंजेक्शनची विक्री करीत आहे. त्या माहितीवरुन हडपसर पोलिसांनी अंबिका ऊर्फ नेहा ठाकूर हिला छापा घालून पकडले.तिच्याकडे चौकशी केली असता तिच्याकडे कोणताही औषध विक्रीचा परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच हे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसल्याची
माहिती मिळाली. मेफेन्टरमाइन सल्फेट (टर्मीन) औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वापरल्यास व व्यक्तीस टोचल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन, औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते.
दरम्यान, याची माहिती असतानाहि अंबिका ऊर्फ नेहा ठाकुरने नशा करण्यासाठी गैरवापर करणाच्या उद्देशाने बेकादेशीररित्या विक्री करता मोठ्या प्रमाणात औषध बाळगल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे हे
तपास करीत आहेत.ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे निरीक्षक निलेश जगदाळे,अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस
निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे,पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार,कुंडलिक केसकर, अमोल दणके, गायत्री पवार यांनी केली
आहे.
No comments:
Post a Comment