24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये ग्राहक जनजागृतीचे कार्यक्रम होणार..
पुणे:- जिल्हा प्रशासन व ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात व ग्राहक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या 24 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी मा. डॉ. सुहास दिवसे जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यक्रमाचा आढावा घेतला, व सर्व शासकीय विभाग यांनी ग्राहकांच्या हक्का बाबत जनजागृती कार्यक्रम घेण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. या वर्षी पुणे जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम राबवून ग्राहक जनजागृती केली जाणार आहे. यामधे अन्न ओषध प्रशासन, वैधमापन शास्त्र, आरोग्य, महावितरण, पोलीस, दूरसंचार, RTO, ST महामंडळ, कृषी, सहकार, पेट्रोल गॅस ईत्यादी विभागा बाबत ग्राहकांना मार्गदर्शन केले जाणार आहे, तसेच जिल्हय़ात शाळा महाविद्यालये यांचे व्याख्याने आयोजित करून विद्यार्थी ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे, त्याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन या निमित्ताने आपल्या वृत्तपत्राच्या माध्यामातून सर्वसामान्य नागरिकांना करीत आहे.
तुषार झेंडेपाटील, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत,पुणे जिल्हा
सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, पुणे 9545594959
No comments:
Post a Comment