धक्कादायक..प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देणारी निघाली बायको; 72 वेळा वार करून त्यांचा केला होता निर्घृण खून... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 26, 2024

धक्कादायक..प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देणारी निघाली बायको; 72 वेळा वार करून त्यांचा केला होता निर्घृण खून...

धक्कादायक..प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देणारी निघाली बायको; 72 वेळा वार करून त्यांचा केला होता निर्घृण खून...
पुणे:-नुकताच पुण्यात आमदार यांच्या मामाचा अपहरण करून खून केल्याची घटना घडली हा खून का व कशासाठी झाला याची धक्कादायक माहिती नुकताच समोर आली, या मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ  यांचं  नऊ डिसेंबरला अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. शिवाय हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांचा तपास
सुरू होता. काहींना अटक देखील करण्यात आली होती. पोलीस तपासात  सर्वात
मोठा खुलासा समोर आला. शेजाऱ्यासोबत असलेल्या प्रेम संबंधात अडसर ठरत असलेल्या नवऱ्याची सुपारी देऊन पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक माहिती समोर
आली आहे. हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ  यांची त्यांच्या पत्नीनेच पैसे देऊन हत्या करायला लावली आहे. मोहिनी वाघ असं या प्रकरणातील आरोपी पत्नीचे नाव आहे. दरम्यान ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती आहे.48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या
इंजिनिअरसोबत अफेअर सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाच्या मित्रासोबत
मोहिनी वाघचे असलेल्या अनैतिक संबंधातून पती सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं आहे.भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात
आली होती. मात्र, सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आलेल्या अपहरणातून नाही तर अनैतिक संबंधांतून झाल्याचं समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी
वाघ हीला काल अटक केली आहे. मोहिनी
वाघचे वय सध्या 48 वर्षे असून तिचा प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे. अक्षय जावळकर हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र होता. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र, सतीश
वाघ यांना हे समजताच मोहिनी -सतीश आणि अक्षय यांच्यामध्ये वाद सुरु झाले होते.अनेक वर्षे त्यांच्यातील वाद धुमसत होता आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या झाल्याची माहिती आहे.
अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांचा पूर्वीचा भाडेकरू सतीश तात्याबा वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. त्या वेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण
झाले. यासंबधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला. मोहिनी वाघने अक्षयला नवरा सतीश यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत सहभागी करून घेतले. अक्षयने
आरोपींना दीड लाखाची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे. सतीश वाघ हे
9 डिसेंबरला सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकवा गेले असताना पाच जणांनी त्यांचे अपहरण करून अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाडीतच वाघ यांच्यावर 72
वेळा वार करून त्यांचा निर्घृण खून केला. तासाभरात या सर्व गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला. गुन्हे शाखेने त्यांचं अपहरण झालेल्या ठिकाणाहून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून
आरोपींना अटक केली.पोलिसांना सतीश वाघ यांच्या पत्नीचा गुन्ह्यात सहभाग असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचले, तिला आता पोलिसांनी अटक केली आहे.व तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment