नीरा देवघर धरणाचे कॅनॉलचे अपूर्ण काम पूर्ण करणेकरिता भरीव निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 12, 2024

नीरा देवघर धरणाचे कॅनॉलचे अपूर्ण काम पूर्ण करणेकरिता भरीव निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र..

नीरा देवघर धरणाचे कॅनॉलचे अपूर्ण काम पूर्ण करणेकरिता भरीव निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र..
माळशिरस:- नीरा देवधर पाणी संघर्ष समिती च्या वतीने श्री. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई.यांना नीरा देवघर धरणाचे कॅनॉलचे अपूर्ण काम पूर्ण करणेकरिता भरीव निधीची तरतूद करणे व सदर योजना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना यामध्ये समावेश करणेबाबत चे पत्र नुकताच देण्यात आले,आपली प्रगतशील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा बहूमताने जनतेने निवड केल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.वरील विषयी आपणास विनंती करण्यात येते की, नीरा देवघर धरण हे सन २००० साली बांधून पूर्ण झालेले असून पूर्ण क्षमतेने भरले जात आहे. तथापि त्या वरील कॅनॉलची कामे अपूर्ण असल्यामुळे लाभार्थी गावांना व लाभार्थी रयत जनतेला अद्याप ते पाणी मिळालेले नाही. सदर  योजना लाभार्थी गावाकरिता नवसंजीविनी देणारी आहे. लाभार्थी गावातील कायमस्वरूपी असणारा
दुष्काळ संपणार आहे. सदरची लाभार्थी शेतकरी रयत त्या पाण्यामुळे सुखी व समृद्ध होणार आहे. तो भाग व तो परिसर अद्यापही मागासलेला राहिलेला आहे. आज अखेरच्या लोकप्रतिनिधी यांनी हवे तेवढे लक्ष न दिल्याने ही योजना दुर्लक्षित राहिली व लाभ क्षेत्रात नसलेल्या भागांना जाणूनबुजून पाणी दिले जात आहे. लाभार्थी गावावर फार मोठा अन्याय व अत्याचार या भागातील लोकप्रतिनिधी व मायबाप सरकारने केला असा या भागातील रयत जनतेचा अंदाज, संशय व समज झालेला आहे.आपणाकडे महाराष्ट्राच्या विकासाचे एक व्हीजन आहे एक उत्तम स्वप्न आहे. तेव्हा खंडाळा जि. सातारा, फलटण जि. सातारा आणि माळशिरस जि. सोलापूर या भागातील त्या योजनेवरील
सर्वच लाभार्थी गावे व रयत जनतेची नम्र विनंती आहे सदरची योजना अपूर्ण असून सदर योजनेकरीता लागणारा आर्थिक निधी आपण तातडीने भरीव असा मंजूर करावा.गरज पडल्यास सदरची योजना ही केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना या योजनेमध्ये खास बाब म्हणून मंजूर करून घ्यावी व या योजनेच्या लाभार्थी सर्व जिल्हे व तालुके यांना
लवकरात लवकर न्याय आपल्या कारकीर्दीमध्ये मिळावा ही या भागातील रयत जनतेची नम्र व
कळकळीची विनंती आहे.आपल्या संदर्भीय पत्रानुसार रु. १५० कोटी जो निधी सदर योजनेस मिळालेला आहे. तो निधी खर्ची पडून ही अद्याप योजना अपूर्ण आहे. आपण जातीने या योजना पूर्ततेकडे लक्ष द्यावे असे पत्र नुकताच देण्यात आले असल्याचे नानासाहेब राणे,सर
संस्थापक कार्याध्यक्ष निरा देवघर पाणी संघर्ष समिती यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment