' ऊसतोड मजुरांच्या मुलांनी लुटला कोडी सोडवण्याचा आनंद..!
सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा अभ्यासवर्ग तीन वर्षांपासून सोमेश्वर येथे सुरू आहे. यामध्ये मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पाच गटांमध्ये मुलांसाठी अभ्यास वर्ग चालवला जातो, साधारण ऊसतोड हंगामाच्या कालावधीत हा अभ्यास वर्ग सुरू असतो. यासाठी समन्वयक व स्वयंसेवक काम करीत असतात. मुलांना अक्षर ओळख व्हावी व लिहिता वाचता यावे. तसेच प्रगत काळासोबत स्वतःची ओळख निर्माण करता यावी, याकरिता असणारी विविध कौशल्य या अभ्यास वर्गात शिकवली जातात. अभ्यासाव्यतिरिक्त आवांतर वाचन, जिज्ञासा,माहिती व मनोरंजनाबरोबरच कोडी सोडवता यावी याकरिता बारामती येथील रागिनी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने मुलांना साप्ताहिक करवीर नगरी प्रकाशित च्यावं-म्यावं या मासिकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी 'कोपीवरची शाळा' अभ्यासवर्गाचे समन्वयक संतोष शेंडकर,स्वयंसेवक संतोष होनमाने, संभाजी खोमणे, नौशाद बागवान उपस्थित होते.तर या कार्यक्रमासाठी रागिनी फाऊंडेशनचे राजश्री आगम, प्रा. सीमा गोसावी साक्षी आंबेकर, ज्योती बोधे,सुजाता लोंढे, शितल रायते, पूजा बोराटे यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment