वस्तू व सेवा कर अभय योजना २०२४ – व्यापारी व उद्योजकांसाठी सुवर्ण संधी! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 19, 2024

वस्तू व सेवा कर अभय योजना २०२४ – व्यापारी व उद्योजकांसाठी सुवर्ण संधी!

वस्तू व सेवा कर अभय योजना २०२४  – व्यापारी व उद्योजकांसाठी सुवर्ण संधी!
बारामती:- दि. १६ डिसेंबर २०२४ – वस्तू व सेवा कर विभाग पुणे, दि बारामती चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, व्यापारी महासंघ बारामती, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलोपमेंट अससोसिएशन, दि बारामती मर्चंट्स अससोसिएशन व रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "वस्तू व सेवा कर अभय  योजना 2024" या सेमिनारमध्ये व्यापारी व उद्योजकांना अभय योजने संदर्भात त्याच्या फायदे, पात्रता निकष, नोंदणी प्रक्रिया, अटी व शर्ती आणि योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

वस्तू व सेवा कर विभाग पुणे येथील श्री संजीव पाटील, अप्पर राज्यकर आयुक्त यांच्या मार्गदर्शनाने या सेमिनार मध्ये डॉ. राजेंद्र कुऱ्हाडे, राज्यकर सहआयुक्त, पुणे, व श्री.अजय नेवसे, राज्यकर उपआयुक्त, पुणे यांनी GST अभय योजने संदर्भात  उपस्थितांचे  मार्गदर्शन व  शंका समाधान केले. सदरच्या कार्यक्रमासाठी राज्यकार अधिकारी श्री तुषार आंबेडे, श्री अभिजित गायकवाड, श्री सुधीर अडसूळ हे उपस्तिथ होते. 

सदर सेमिनारमध्ये सहभागी व्यापारी व उद्योजकांना GST कायद्यातील विविध अडचणी, जसे की VAT व Service Tax चे GST मध्ये ट्रान्सफर करताना आलेल्या समस्यांचा सामना, GST कौन्सिलचे कायद्यातील वेगवेगळे बदल, आणि प्रारंभिक काळात झालेल्या क्लेरिकल चुकांमुळे व्यापाऱ्यांना आलेल्या नोटिसांविषयी सुस्पष्ट माहिती मिळाली. या योजनेद्वारे सरकार व्यापाऱ्यांना दिलासा देणार आहे आणि वर्ष २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या काळातील त्रुटी सुधारण्यासाठी एकमेव  संधी असल्याचे सांगण्यात आले. 

संपूर्ण सेमिनार हे व्यापारी व उद्योजकांसाठी एक सुवर्ण संधी ठरली, जिथे त्यांना जीएसटी कायद्यातील विविध सुधारणा, दंड व कराच्या नोटिसांवर उपाय आणि योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या सुटीवर सखोल माहिती देण्यात आली.

सदरच्या कार्यक्रमासाठी श्री. प्रशांत सातव यांनी विशेष सहकार्या केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी ए नवनाथ साळुंखे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी ए प्रतीक दोषी यांनी केले. सदरच्या कार्यक्रमासाठी श्री सुशील सोमाणी, श्री धनंजय जामदार, श्री संभाजी किर्वे, श्री अरविंद गरगटे, सी ए प्रीतम पहाडे व बारामती नगरीतील चार्ट्रेंड अकाउंटंट्स, कर सल्लागार तसेच सर्व व्यापारी व उद्योजक बहुसंख्येने उपस्तिथ होते.
 
सी ए गिरीश सातव यांनी सर्व उपस्थितांचे मनापासून धन्यवाद दिले आणि भविष्यात अशी आणखी सेमिनार आयोजित करण्याची ग्वाही दिली.

*GST अभय योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी  या हेल्पलाईन क्रमांक ०२०-२६६०९१४० वर संपर्क साधू शकता.*

No comments:

Post a Comment