बारामती पोलीसांनी खुनातील आरोपींना केले १२ तासाचे आत अटक...
बारामती:-दिनांक १९/१२/२०२४ रोजी रात्रौ १०/३० वाजनेचे सुमारास अभिषेक सदाशिव गजाकस याचा भाऊ अनिकेत सदाशिव गजाकस वय २३ वर्षे हा बांरामती मधील प्रगतीनगर क्रियेटिव्ह अॅकॅडमी कडुन टिसी कॉलेजकडे जाणारे रोडवरुन जात असताना यातील आरोपी नामे १) नंदकिशोर पंजाबराव अंभोरे वय १९ वर्षे रा.शेळकेवस्ती तांदुळवाडी बारामती ता- बारामती, जि पुणे २ महेश नंदकुमार खंडाळे वय
२१ वर्षे रा यदुपाटीलनगर तांदुळवाडी ता बारामती जि पुणे ३ संग्राम दत्तात्रय खंडाळे वय २१ वर्षे रा शेळकेवस्ती तांदुळवाडी ता बारामती जि पुणे यांनी स्प्लेंडर मोटार सायकल वर येवुन आरोपी यांनी यातील मयत अनिकेत यास आ नं १ नंदकिशोर पंजाबराव अंभोरे याचे आते बहिणीसोबत बोलण्याचे कारणावरुन हातातील कोयत्याने त्याचेवर वार करुन जीवे ठार मारुन त्याचा खुन केला.सदर घडले प्रकाराबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे माहिती मिळताच सदर ठिकाणी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पोहचले व त्यांनी तात्काळ सदर गुन्हयाचा शोध सुरु करुन फिर्यादी अभिषेक सदाशिव गजाकस यांचे फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला
सदर घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी देवुन मार्गदर्शन करुन तपास सुरु केला सदर गुन्हयातील आरोपी हे सदरचा गुन्हा करुन फरार झाले होते सदर गुन्हयातील आरोपींचे मोबाईल नंबर मिळवुन त्याचे सीडीआर काढुन गुप्त बातमीदारामार्फत आरोपींची माहिती काढुन सदर आरोपींनी विनाविलंब सोलापुर जिल्हयातील अकलुज खंडाळी येथुन शिफातीने पकडुन सदर आरोपींना काल दिनांक २०/१२/२०२४ रोजी २१/३० वाजता अटक केली आहे. त्यादरम्यान आरोपींकडुन सदर गुन्हयात वापरेली मोटार सायकल जप्त करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.सदरची कारवाई मा श्री पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण ,मा श्री गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण, मा श्री बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी, मा श्री अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली मा श्री विलास नाळे पोलीस निरिक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन श्री कुलदिप संकपाळ सपोनि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व टिम बारामती शहर पोलीस स्टेशन चे श्री सतीश राऊत पोलीस उपनिरिक्षक
व त्यांची टिम यांनी सदर गुन्हयात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सपोनि श्री गजानन चेके हे करीत आहेत.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशन श्री कुलदिप संकपाळ सपोनि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिण,पोलीस कर्मचारी अभिजित एकशिंगे ,रामचंद्र शिंदे व टिम यांना पाच हजाराचे बक्षीस देण्याचे जाहीर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी जाहीर केले.तसेच बारामती कराना जाहीर आव्हान करण्यात आले की कुणी त्रास अथवा धमकी किंवा दहशत माजवत असेल तर तात्काळ मो. 9209394917 या नंबरवर फोन किंवा वॉट्सअप्प करावा असे सांगण्यात आले.तसेच या घटनेत गुन्हेगाराला कोयता पुरविलेल्या आरोपीपर्यत पोहचण्यासाठी प्रयत्न आहे. लवकरच अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment