खळबळजनक.. महिलेला ग्रामसेवक म्हणाला "तुम्ही मला खूप खूप आवडता,चला आपण जावू" गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 22, 2024

खळबळजनक.. महिलेला ग्रामसेवक म्हणाला "तुम्ही मला खूप खूप आवडता,चला आपण जावू" गुन्हा दाखल...

खळबळजनक.. महिलेला ग्रामसेवक म्हणाला "तुम्ही मला खूप खूप आवडता,चला आपण जावू" गुन्हा दाखल...
मंगळवेढा:-महिला सुरक्षित नसल्याचे अनेक घटना पुढे येत आहे, तर रस्त्यात महिलेला अडवून छेड काढली जाते, नुकताच एका कार्यक्रमास पायी चालत जाणाऱ्या ४२ वर्षीय
महिलेला मोटर सायकल थांबवून माझ्या गाडीवर बसा तुम्हाला सोडतो असे म्हणताच सदर महिलेने नकार दिला असता तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? तुम्ही मला खूप... खूप आवडता चला आपण मंगळवेढ्याला जावू असे म्हणून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी गुंजेगाव येथील ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामसेवक अभिजीत अशोक लाड (रा.रड्डे) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील पिडीत महिला तथा फिर्यादी दि.१८ रोजी पंचायत समितीचे
विस्तार अधिकारी नरळे यांनी फिर्यादीने ग्रामसेवक यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी कामे बोलावले होते.
सदरची चौकशी पुर्ण झाल्यानंतर दुपारी दोन च्या दरम्यान पिडीता ही भावकीतील लग्नाच्या बांगड्याचा कार्यक्रम असल्याने त्या खोमनाळ ते मंगळवेढा रोडने घराकडे जात असताना मुरशीदबाबा दर्याजवळ पाठीमागून आरोपी तथा ग्रामसेवक अभिजीत लाड हे मोटर सायकलवर आले व त्यांनी फिर्यादीस पाहून गाडी थांबविली व माझ्या गाडीवर बसा मी तुम्हाला सोडतो असे
म्हणाला.त्यावेळी फिर्यादीने त्यास साफ नकार दिल्यानंतर आरोपीने तुम्ही माझ्यावर नाराज आहात का? तुम्ही मला खूप खूप आवडता, चला आपण मंगळवेढ्याला जावू असे ते म्हणाले.
त्यावर फिर्यादी ह्या खूपच घाबरल्याने त्यांनी त्यांच्या पतीला फोन लावून बोलावून घेत असताना आरोपीने मंगळवेढ्याकडे पलायन केले. दरम्यान यानंतर फिर्यादीचे पती, त्यांचे मित्र प्रभू इंगळे,रघुनाथ पवार व मुलगा प्रतिक असे सर्वजण घटनास्थळी आले असता फिर्यादीने घडला प्रकार सांगीतला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास
पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment