वडिलांना दिला मुलीने अग्नि; सर्व विधी पाडल्या पार..
सगळयांवर फिरवला मायेचा हात,
सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ."
मरावे परी कीर्तिरुपे उरावे"अशी म्हण ज्यांचेसाठी योग्य ठरावी असे एक व्यक्तिमत्व के.दिलिप वसंत पंडित यांचे सोमवार दि.२३/१२/२०२४रोजि मावळत्या सूर्याबरोबर एक तारा अनंतात विलीन झाला तो पुन्हा कधी न उठवण्यासाठी. परुंतु आपल्या प्रग्लभ विचाराचा प्रकाश सर्व समाजमनामध्ये नवीन विचार प्रज्व्वलीत करून गेला.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,विवाहित मुलगी, अविवाहीत मुलगी असा परिवार आहे.मुलींचा नेहमी अभिमान असणाऱ्या या पित्याच्या अंतिम इच्छेनुसार सर्व अंत्यविधी त्यांच्या मुलींनी पार पाडले.त्याची धाकटी कन्या कु.रसिका दिलिप पंडित यांनी त्यांना अग्नी देण्यापासून सर्व विधी पार पाडले असून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
No comments:
Post a Comment