ऐकावे ते नवलच..हरभरे खाल्ले नाहीत म्हणून बायकोकडून नवऱ्याला बेदममारहाण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 3, 2024

ऐकावे ते नवलच..हरभरे खाल्ले नाहीत म्हणून बायकोकडून नवऱ्याला बेदममारहाण..

ऐकावे ते नवलच..हरभरे खाल्ले नाहीत म्हणून बायकोकडून नवऱ्याला बेदम
मारहाण..
पुणे:-सतत नवऱ्याने बायकोला मारल्याचा बातम्या येत असतात मात्र येथे तर उलटंच झालं पुणे शहरातील सोमवार पेठ भागातून एक बातमी समोर आली आहे. नवऱ्याने मोड
आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरुन बायकोने नवऱ्याला बेदम मारहाण केली. या महिलेने लाटणं आणि मिक्सरच्या भांड्याने नवऱ्याला बेदम मारहाण केली, तसेच
करंगळीचा चावा घेऊन नख देखील तोडले.
या प्रकरणी सोमवार पेठ येथील त्रिशुंड गणपती मंदिराजवळ राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीकडून त्याच्या चाळीस वर्षीय पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. तक्रारदाराने घरात मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत, या कारणावरून त्यांच्या नवऱ्याने शिवीगाळ करून त्यांना लाटण्याने तळ हातावर, डोक्यात,पाठीवर मारले. तक्रारदाराने बायकोच्या हातातील लाटणे
हिसकावून घेतले.  चिडलेल्या बायकोने मिक्सरचे भांडे घेऊन दोन वेळा तक्रारदाराच्या डोक्यात मारले.त्यानंतर बायकोने तक्रारदाराला खाली ओढल्यामुळे
तक्रारदार खाली बसले आणि स्वरक्षणासाठी दोन्ही हात वर करून डोके झाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी बायकोने रागाच्या भरात पतीच्या हाताच्या करंगळीला चावून नख
तोडले. तसेच, हाताच्या नखांनी तोंडावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे तसेच पोटाला ओरखडले. या घटनेनंतर घाबरलेल्या नवऱ्याने पोलिसात धाव घेतली. पोलिसांना
घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केली आहे.

No comments:

Post a Comment