धक्कादायक.. चाकूने सपासप वार करून महिलेचा खून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 4, 2024

धक्कादायक.. चाकूने सपासप वार करून महिलेचा खून..

धक्कादायक.. चाकूने सपासप वार करून महिलेचा खून..
इंदापूर:-पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून खून खुनासारखे प्रकार घडत असल्याचे मागील घडलेल्या अनेक घटनेवरून दिसत आहे,नुकताच चाकूने सपासप वार करत विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली हत्येनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी याठिकाणी चाकूने सपासप वार करीत विवाहित महिलेची निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.सुनिता दादाराव शेंडे, वय. ३३ वर्षे (
रा. शेंडेवस्ती, ता.इंदापूर, जि. पुणे) असे हत्या
करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी महिलेचे पती दादाराव निवृत्ती
शेंडे, वय ३७ वर्षे ( रा. शेंडेवस्ती, निमगाव
केतकी, ता. इंदापूर जि. पुणे) यांनी इंदापूर पोलीस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे खुनाची घटना
घडल्यानंतर आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस
ठाण्यात हजर झाला.याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर रा.सुरवड ता. इंदापुर जि.पुणे याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बुधवारी रात्री आठ ते साडे आठच्या दरम्यान निमगाव केतकी
सराफवाडी रोडवरील आजिनाथ मोरे यांच्या
पत्र्याच्या शेडमध्ये ज्ञानेश्वर रासकर यांनी अज्ञात
कारणामुळे सुनिता शेंडे यांच्या डोक्यात पोटात
आणि छातीवर चाकूने वार केले. यात सुनिता शेंडे
यांचा मृत्यू झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस
उपनिरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.

No comments:

Post a Comment