संयुक्त भारत पक्षाच्या भिवंडी शहर अध्यक्ष पदी अस्लम अन्सारी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 22, 2024

संयुक्त भारत पक्षाच्या भिवंडी शहर अध्यक्ष पदी अस्लम अन्सारी...

संयुक्त भारत पक्षाच्या भिवंडी शहर अध्यक्ष पदी अस्लम अन्सारी...
भिवंडी (प्रतिनिधी):- भिवंडी शहरातील  सुप्रसिद्ध व्यवसायिक व समाजसेवक अस्लम रजा अन्सारी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह संयुक्त भारत पक्षात प्रवेश केला असून त्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा . अशोकजी बहादरे यांच्या उपस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव: मा . संभाजीराव जाधव यांच्या शुभ हस्ते भिवंडी शहर अध्यक्ष पदीचे नियुक्ती पत्र अस्लम रजा अन्सारी यांना प्रदान करण्यात आले तसेच भिवंडी शहर सचिव पदी इरफान अली रैना  यांची नियुक्ती करण्यात आली , येणाऱ्या भिवंडी महानगर पालिका निवडणूकित अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवणार असून 
भिवंडी महानगर पालिकेत संयुक्त भारत पक्षाचे अनेक नगरसेवक जनतेची सेवा करताना आपणास दिसतील भिवंडी शहरातील रस्ते, गटारी, शाळा, आरोग्य, व पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि इतर समस्या सोडवून भिवंडी शहराचा सर्वांगीण विकासासाठी संयुक्त भारत पक्षाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करतील असे नवनियुक्त शहर अध्यक्ष अस्लम रजा अन्सारी यांनी सांगितले, 
सदर कार्यक्रमास  पक्षाचे प्रदेश सचिव : मा. अनिल काळने , उल्हासनगरचे सुप्रसिद्ध समाजसेवक मा. विजय सिंग , तौफिक मणियार, फिरदौस पटेल आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते 
नवनियुक्त अध्यक्ष: अस्लम अन्सारी व त्यांच्या सहकाऱ्यांना भावी राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा l

No comments:

Post a Comment