जुन्या भांडण्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला करण्याऱ्याना पाठलाग करून घेतले ताब्यात..
माळेगाव:- माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्र अंतर्गत मौजे माळेगाव बु । । नगरपंचायत ता. बारामती जि. पुणे हददीतील शिवनगर येथे दिनांक 05/12/2024 रोजी स. 11.30 वा. चे सुमारास इसम नामे श्री. प्रकाश उर्फ पप्पु दिगंबर भापकर वय - 33 वर्ष, रा. अजिंक्यनगर,माळेगाव बु।। ता.बारामती जि. पुणे हे त्यांचे शिवनगर येथील फायनान्स कंपनीचे कार्यालयात त्यांचे सहकारी दादासो नारायण भाते यांचेसह बसलेले असताना त्यांचे कार्यालयात 1) चेतन बाळु जाधव, 2) मयुर रणजित जाधव, 3) विजय बाळासो कुचेकर, 4) दिनेश आडके अ.क्र 1 ते 4 सर्व रा. माळेगाव बु ।। ता. बारामती जि. पुणे यांनी अचानकपणे घुसुन मागील दिड ते दोन महीन्यांपुर्वी जुने भांडणाचे कारणावरुन त्यांचे सोबत आणलेले धारदार शस्त्रांनी इसम नामे श्री. प्रकाश उर्फ पप्पु दिगंबर भापकर यांचे डोक्यात, मानेवर,डावे तसेच उजवे हातावर, तसेच इतर ठिकाणी वार करुन गंभीर जखमी करीत असताना श्री. भापकर यांचे सोबत हजर असलेले
त्यांचे सहकारी श्री.दादासो माने हे भापकर यांना सोडविणेसाठी गेले असता त्यांनी देखील ग्लास फेकुन मारुन 2 मोटार सायकल वरुन निघुन गेलेले आहेत, अशी गोपनीय माहीती माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी स. पो. नि. श्री. सचिन लोखंडे यांना मिळाले नंतर सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन माळेगाव पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची 2 तपास पथके तयार करुन त्यांना सदर घटनेच्या तपासाचे अनुषंगाने हल्लेखोरांना ताब्यात घेणे व इतर आवश्यक सुचना देवुन तात्काळ रवाना केले.
सदर हल्लेखोर हे गुन्हा करुन फरार होणेची शक्यता असलेने पोलीस तपास पथक यांना मिळालेले गोपनीय माहीतीचे आधारे तसेच सी.सी.टी.व्ही कॅमेरा फुटेज तसेच इतर तांत्रिक विश्लेषणातुन सदर घटनेतील हल्लेखोर क्रमांक 1 ) चेतन बाळु जाधव,2) मयुर रणजित जाधव, 3) विजय बाळासो कुचेकर असे त्यांचे कडील 2 मोटार सायकल वरुन पळुन जात असताना त्यांना फलटण नगरपालिका हददीतील कचरा डेपो परीसरात पाठलाग करुन ताब्यात घेतलेले असुन त्यांचा उर्वरीत साथीदार दिनेश आडके याचा
मौजे पणदरे ता.बारामती गावचे हद्दीत शोध घेवुन त्यांस ताब्यात घेतलेले आहे.वरील प्रमाणे घटनेच्या अनुषंगाने श्री. प्रकाश उर्फ पप्पु दिगंबर भापकर वय - 33 वर्ष, रा. अजिंक्यनगर, माळेगाव बु ।। ता.बारामती जि.पुणे यांचे फिर्यादी वरुन माळेगाव पोलीस ठाणे येथे गु.र.नं- 301 / 2024 भारतीय न्याय संहीता कलम 109, 333, 352,351 (3), 3 (5), 125 (अ), सह शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 25 या प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल खटावकर हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा.श्री पंकज देशमुख . पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा.डॉ.श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, मा. श्री. अविनाश शिळीमकर .
वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे कडील स.पो.नि.
श्री. सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अमोल खटावकर, श्री. देविदास साळवे, सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. शरद तावरे, पो. हवा
श्री. अमर थोरात, पो.ना. श्री.ज्ञानेश्वर सानप, पो. कॉ. श्री. नंदकुमार गव्हाणे, श्री. राहुल पांढरे, श्री. विजय वाघमोडे, श्री.अमोल राऊत, श्री.
ज्ञानेश्वर मोरे, श्री.जालिंदर बंडगर, श्री. विकास राखुंडे व होमगार्ड श्री. सागर कोळेकर, श्री. विक्रम मदने यांनी केलेली आहे
No comments:
Post a Comment