लिफ्ट देवून केला दरोडयाचा गुन्हा पोलीसांनी अवघ्या ४ तासात आवळल्या सराईत आरोपींच्या मुसक्या..
इंदापूर:- दिनांक १२/१२/२०२४ रोजी दुपारी ०२ / ४५ वा. वाजता महीला
नामे सुभद्रा सदाशिव पारेकर वय ५५ वर्ष रा. वनगळी ता इंदापूर जि पुणे
या वनगळी येथे पुणे सोलापूर हायवे रोडवर त्याचे मुलीकडे भिगवन येथे
जाणेसाठी वाहनाची वाट पहात थांबल्या होत्या. त्यावेळी तिला एकटीला वाट
पहात असल्याचे पाहून एक चारचाकी वाहन तिचे जवळ येवून थांबले
त्यामध्ये एकुण ४ महीला व २ पुरुष होते. त्या महीलेस यायचे का असे
विचारून तिला वाहनात लिफ्ट देवून थोडे अंतर पुढे गेल्यावर निरमणुष्य
ठिकाणी त्या महीलेस सर्वानी दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी देवून
तिला वाहनात खाली दाबुन तिचे जवळील ४९०००/- किंमतीचे सोन्याचे
मनीमंगळसुत्र जबरदस्तीने काढून घेवून तिला वाहनातून खाली उतरुन
दिले व वाहन घेवून पळून गेले. त्यानंतर सदर महीलेने रस्त्याने जाणारे
एका इसमास घडलेला प्रकार सागीतला त्यांनी तात्काळ सदरचा प्रकार
इंदापूर पोलीस स्टेशनला कळविला.
त्यावरुन घटनेचे गांर्भीय ओळखून तात्काळ गुन्हे शोध पथकाचे
सपोनि जीवन मोहीते, सहा पो फौजदार प्रकाश माने, पो हवा सलमान खान,
पो अंमलदार गणेश डेरे, अंकुश माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण असे
घटनास्थळी पोहचले तेथील पहाणी करुन व नमुद महीलेस विचारपुस
करुन तिने आरोपींचे व वाहनाचे केलेल्या वर्णनावरून तपासाची चक्रे फिरवून पुणे सोलापूर हायवे रोड भिगवन ते गोकुळ हॉटेल या भागामधील
हॉटेल, लॉजेस, ढाबे, टोलनाका पिंजुन काढले लोकांना विचारपुस
करणे,फुटेज पहाणे वाहन निष्पन करणे अशी चौकशी करुन संशयीत
वाहन याचा शोध चालू केला त्यावेळी नमुद वहान हे निष्पन्न झालेवर
वेगवेगळी तपास पथके करुन सदरचे वहान दिसून आलेवर पोलीस मागे
लागल्याचे पाहून ते तरंगवाडी शिवारात पळून जात असताना त्यास पोलीस
पथकाने पाठलाग करुन पकडले त्यावेळी त्यातील महीला व पुरुषांना त्यांची
नावे पत्ते विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देवून खोटे नावे
सांगून खोटी बतावणी केली परंतु अधिक चौकशी केली असता ते सोलापूर
जिल्हयातील सराईत टोळी असल्याचे निष्पन झाले. त्यांना पोलीसी खाक्या
दाखविल्यावर त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्यावेळी त्यांची खरी नावे पत्ते
मिळाले त्यांची नावे १) संभाजी शिवाजी भोसले २) दिपू रवि भोसले ३)
कावेरी उर्फ सौदर्या दिपू भोसले ४) ममता संभाजी भोसले ५) चॉद दिपू
भोसले ६) महानंदा भद्री पवार सर्व रा. बिस्मील्हा नगर मुळेगाव ता दक्षिण
सोलापूर जि सोलापूर अशी असून त्यांचे ताब्यात महीलेचे चोरलेले सोन्याचे
दागीने मिळून आले.. त्यांचेवर सोलापूर, उस्मानाबाद, पुणे ग्रामीण, मुंबई
शहर या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहीती मिळाली
आहे. त्यावरुन इंदापूर पोलीस स्टेशन येथे गु र न १०३४ / २०२४ बी एन
एस कलम ३१० ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला
असून सर्व आरोपींना
अटक केली आहे. अधिक तपास पोसई दत्तात्रय लेंडवे करीत आहेत. सदरची
कामगीरी मा पो अधिक्षक सौ पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक
गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,पोलिस
निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन मोहीते, सपोनी शंकर राउत, पोसई दत्तात्रय लेंडवे, सहा पो
फौजदार प्रकाश माने, पो हवा सलमान खान, पो अंमलदार गणेश डेरे,अंकुश
माने, विशाल चौधर, तुषार चव्हाण, प्रविण शिंगाडे, सुरज
गुंजाळ, महीला पो अंमलदार माधूरी लडकत, काजल शेळके, वागवकर यांनी
केली आहे.
No comments:
Post a Comment