धक्कादायक.. बारामतीत कोयता गँगने तरुणाचा कोयत्याने वार करून खून;पुन्हा हादरवली बारामती..
बारामती:- बारामती शहरात सारखे खून होत राहिल्याने बारामती हादरून गेली आहे टी सी कॉलेज मधील घटनेला काही दिवस उलटत नाही तोच लगत बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते टी सी कॉलेज रस्त्यावर रात्री अकरा
वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय युवकाचा
कोयत्याने निर्घृण वार करत खून करण्यात
आला. गेल्या काही महिन्यात अनेक खून व खुनाचे प्रकार घडले आहे,प्रगतीनगर व सातव चौक येथे अनेक क्लासेस व अकेडमी असल्याने बाहेर गाव व येथील मुलं मुली शिकायला येतात याठिकाणी सतत गर्दी असते तर काही उनाड मुलं याठिकाणी फेऱ्या मारत असतात अश्यावेळी अनेक वाद झाले असल्याचे कळतंय, तर आत्ता नुकताच पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या
सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह
अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज
रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या
युवकाचा कोयत्याने वार करण्यात आले.
यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अनिकेत
गजाकस याचा मृत्यू झाला. प्राथमिक
माहितीनुसार मुलीशी बोलत असल्याच्या
कारणावरून हा प्रकार घडल्याचा संशय
आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा
दाखल केला आहे. नंदकिशोर पंजाबराव
अंभोरे रा प्रगतीनगर ता बारामती जि पुणे
2) महेश नंदकुमार खंडाळे रा. तांदुळवाडी
रोड जिजामातानगर बारामती जि पुणे 3)
संग्राम खंडाळे (पुर्ण नाव पत्ता माहीती
नाही) अशी या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस
यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद
दिली असून, पोलिसांनी तिघेजणांविरोधात
गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास
सहाय्यक निरीक्षक गजानन चेके हे करीत असून बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री विलास नाळे व अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आहे.
No comments:
Post a Comment