बापरे..बारामतीत बारामती- भिगवण रोडलगत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांने केला ९ कोटींचा अपहार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 9, 2024

बापरे..बारामतीत बारामती- भिगवण रोडलगत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांने केला ९ कोटींचा अपहार...

बापरे..बारामतीत बारामती- भिगवण रोडलगत बँकेच्या शाखाधिकाऱ्यांने केला ९ कोटींचा अपहार...
बारामती:- बनावट कागदपत्रांच्या आधारे या बँकेत सुमारे ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली, मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर या बँकेच्या
बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट
कागदपत्रांच्या आधारे या बँकेत सुमारे ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार केला. अमित प्रदीप देशपांडे (रा. सहयोग सोसायटी समोर, गुरुसदन हौसिंग सोसायटी,बारामती) या शाखाधिकाऱ्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी बँकेच्या मुख्य शाखेकडून कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडाल (रा. कोर्टी रोड, परिचारकनगर, पंढरपूर,जि. सोलापूर) यांच्याकडून फिर्याद देण्यात आली.ते मुख्य कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात.पंढरपूर बँकेच्या राज्यात ३० शाखा आहेत. बारामतीत भिगवण रस्त्यावर जळोची येथे एक शाखा आहे. तेथे अमित देशपांडे हे शाखाधिकारी म्हणून काम करतात.बँकेचे मुख्य
मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी
ताळेबंदपत्रकाचे अवलोकन केले असता बारामती शाखेत संशयास्पद व्यवहार होत असल्याचे त्यांना दिसून आले.त्यांनी फिर्यादीला तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार तपासणी केली गेली त्यात ही बाब स्पष्ट झाली.देशपांडे यांनी पदाचा गैरवापर करत तसेच कॅशिअर कम क्लार्क साधना कळंत्रे यांच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली. ती खरी असल्याचे भासवत बँकेत अपहार व अफरातफर केली. बारामती शाखेच्या सस्पेन्स रिसिव्हेबल खात्यातून अधिकार नसताना २ कोटी ३० लाख रुपये परस्पर उचल करून ती त्यांनीच उघडलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात टाकली. बँक ऑफ बडोदा येथे भरणा करण्यासाठी ३१ लाख रुपये
काढत त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली. धन्वंतरी पतसंस्थेच्या नावे पाच बनावट ओडीटीडीआर खाते उघडून त्यातील ३ कोटी २३ लाख ७१ हजार ८९७ रुपये स्वःतच्या फायद्यासाठी वापरले.तसेच बारामती शाखेतील ग्राहकांचे सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये ८३ खातेदारांचे बँकेत ठेवलेले खरे दागिने काढून तेथे बनावट दागिने ठेवले. खरे दागिने बाहेरील
फायनान्स कंपन्यांना देत त्यावर कर्ज काढले. १०
ग्राहकांच्या नावे बनावट खाती काढली. त्यावर बनावट सह्या करून त्या खात्यावर कर्ज वितरित केल्याचे व त्या बदल्यात सोने ठेवल्याचे दाखवून त्यांच्या नावे बँकेत बनावट सोने ठेवले. त्याद्वारे ३७ लाख ५६ हजार ८०३ रुपये स्वतःसाठी वापरले बँकेतील सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये ३ कोटी १८ लाख ३७ हजार ४६४ रुपयांचा अपहार केला. अशी एकूण बँकेची ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार करत
बँकेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे करीत आहेत.

No comments:

Post a Comment