खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल ठोठावला दोन लाखाचा दंड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 22, 2024

खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल ठोठावला दोन लाखाचा दंड..

खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल ठोठावला दोन लाखाचा दंड..
मुंबई:- केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (The Central Consumer Protection Authority - CCPA) शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल ठोठावला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार शुभ्रा रंजन आयएएस स्टडीने प्रकाशित केलेल्या आपल्या जाहिरातीत सर्वोत्कृष्ट 100 मध्ये 13 विद्यार्थी, सर्वोत्कृष्ट 200 मध्ये 28 विद्यार्थी, आणि केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट 300 मध्ये 39 विद्यार्थी असल्याचा केला दावा,या खाजगी शिकवणी संस्थेने आपल्या जाहिराती आणि लेटरहेडमध्ये शुभ्रा रंजन आयएएस आणि शुभ्रा रंजन आयएएसचे विद्यार्थी अशा शब्दांचा वापर केला, यामुळे देखील शुभ्रा रंजन या आयएएस अर्थात सनदी अधिकारी आहेत / होत्या असाही भ्रामक समज निर्माण झाला,शुभ्रा रंजन आयएएस स्टडीने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तात्काळ बंद करव्यात असा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिला आहे. 

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2086973

No comments:

Post a Comment