सोयाबीन हमीभाव खरेदी प्रक्रियेतील शेतक-यांच्या ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ..
बारामती:- केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करिता दि. ६ जानेवारी २०२५ पर्यन्त मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्या सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे त्या शेतक-यांचे सोयाबीन खरेदी करणेत येणार आहे तसेच ज्या शेतक-यांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केली नाही अशा शेतक-यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक, बारामती येथे सोयाबीन नोंद असलेला सन २०२४-२५ पिकपेरा सहीत ७/१२ उतारा, आठ-अ, आधारकार्ड आणि IFSC कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. ज्या शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे अशा शेतक-यांना SMS द्वारे शेतमाल घेऊन येणेची तारीख कळविणेत येते. त्याच दिवशी शेतक-यांनी खरेदी केंद्रावर आपला माल आणावा.
दि. १५ ऑक्टोबर २०२४ पासुन सोबायीन खरेदी केंद्र बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवारातील यांत्रिक चाळणी येथे सुरू आहे. आज अखेर सदर केंद्रावर २५५ शेतक-यांचे २१५० क्विंटल सोयाबीन खरेदी झाले आहे. तरी सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी दि. ६ जानेवारी २०२५ पर्यन्त मुदतीत नोंदणी करून खरेदी केंद्राचा फायदा घ्यावा असे समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment