खासगी सावकारांची येरवडा कारागृहात रवानगी
जेजुरी:-पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील खासगी सावकारी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या तीन जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी(दि. 30) त्यांना सासवड येथील न्यायालयात हजर केले
असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने तिघांचीही येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.येथील हॉटेलचे चालक रवींद्र (बाळासाहेब ) पारखे यांनी खासगी सावकारांच्या जाचाला व त्रासाला कंटाळून
मंगळवारी(दि.24)हॉटेलमधील एका खोलीत विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.या घटनेत सात जणांवर गुन्हा दाखल करीत मोहन जगताप, संभाजी जगताप अक्षय इनामके या तीन जणांना अटक करण्यात आली होती. दोन वेळा देण्यात आलेली पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयीन
कोठडी देण्यात आली आहे.उर्वरित चार जणांचा पोलीस शोध घेत असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी
सांगितले.
No comments:
Post a Comment