ज्ञानेश्वर माऊली गायकवाड यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड --- एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी
बीड( प्रतिनिधी):-गेल्या अनेक वर्षापासून नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले सामाजिक कार्याची आवड जोपासत समाज कार्याच्या माध्यमातून राजकारणाची जोड देवून समाजातील दीन दलीत वंचित घटकांची सेवा करणारे कार्यकर्ते ज्ञानेश्वर माऊली गायकवाड यांची काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
नामदार अजित दादा पवार नामदार धनंजय मुंडे साहेब जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भाऊ नाईकवाडे यांच्या हस्ते या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.
ज्ञानेश्वर माऊली गायकवाड हे गेल्या वीस वर्षांपासून नामदार धनंजय मुंडे साहेब यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्या या एकनिष्ठतेचे फलित म्हणून त्यांची निवड झाली असून या निवडिने सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असे पाहिले जात असून येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून पक्ष बळकटी करनाला चालना मिळणार आहे त्यांनी समाज कार्याच्या माध्यमातून जिल्हा भरात संघटन निर्माण केले असून या त्यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात निर्माण झालेला आहे त्यांच्या या निवडी ने नक्कीच पक्षाला फायदा होईल भटक्या विमुक्त जाती जमाती समूहाला त्यांच्या माध्यमांतून न्याय मिळेल आणि ते नक्कीच येणाऱ्या काळात या समूहाचे प्रश्न निकाली काढतील अशी अपेक्षा त्यांच्या कडून व्यक्त केली जात असतानाच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
No comments:
Post a Comment