लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवलेल्या पिडीतेची सुटका;लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक..
बारामती:- लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवलेल्या पिडीतेची सुटका करून सराईत गुन्हेगारास जेरबंद केले स्थानिक गुन्हे शाखा व माळेगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी ही कारवाई केली याबाबत मिळालेली माहिती अशी की,बारामती उपविभागातील गुन्हे प्रकटीकरणाचे अनुषंगान बारामती उपविभागात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपस्थित असताना मौजे पणदरे ता. बारामती जि. पुणे या गावात एका परराज्यातील महिलेस डांबून ठेवण्यात आलेले असून तिचेवर लैंगिक अत्याचार झाले आहेत, अशी माहिती पथकाला मिळाली. सदरची घटना ही अतिशय संवेदनशील असल्याने घटनेचे
गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेली माहिती पथकाने स्था. गु.शा.चे पोलीस निरीक्षक, अविनाश
शिळीमकर यांना कळविली. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तात्काळ सदरची माहिती मा. पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख पुणे ग्रा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार. बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, बारामती उपविभाग यांना सांगून वरिष्ठ अधिकारी यांचे पुढील कार्यवाही करण्याचे आदेश प्राप्त
करून घेवून स्था.गु.शा.चे पथकास माळेगाव पो स्टे कडील अंमलदार व महिला अंमलदार यांना मदतीस घेवून कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले.दि. १२/०१/२०२५ रोजी स्था. गु.शा. व माळेगाव पो स्टे कडील स्टाफ असे मौजे पणदरे गावातील माहिती मिळालेल्या ठिकाणी गेले होते, त्या ठिकाणी एका हॉटेलचे बांधकाम चालू होते, सदर हॉटेलचे पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या खोल्यांची तपासणी करता एका खोलीत मिळालेल्या बातमीतील पिडीत महिला मिळून आली. तिला महिला अंमलदारांचे मदतीने मानसिक आधार देवून विचारपूस केली असता, पिडीत महिला ही मुळ राहणार मध्यप्रदेशची असून तिचे पती हे तळेगाव दाभाडे येथील
कंपनीतील काम सुटलेने तो गावी गेला होता. पिडीत महिला सध्या एकटीच तळेगाव दाभाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती.
तळेगाव दाभाडे येथे कंपनीत काम करणारे मैत्रीणीकडून पोपट धनसिंग खामगळ याचे सोबत ओळख झाली. त्याचा हॉटेल व्यवसाय आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर इसम नामे पोपट धनसिंग खामगळ याने पिडीतेस पणदरे येथील त्याचे हॉटेल मध्ये काम देतो व १५,०००/- पगार देण्यात येईल असे सांगून इसम नामे पोपट खामगळ याने दि. ०२/०१/२०२५ रोजी पिडीतेस
बारामती येथे बोलावून घेवून तिला बारामती येथून पणदरे येथे पोपट खामगळ याचे काम चालू असलेल्या हॉटेलवर नेले. दि.०३/०१/२०२५ रोजी पहाटेच्या वेळी पिडीत महिला ही पत्र्याच्या खोलीत झोपलेली असताना पहाटेच्या वेळी आरोपी पोपट खामगळ याने पिडीतेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व कोणास काही एक सांगितले तर खून करील अशी धमकी दिली,तसेच तुझेवर वॉचर नेमलेले आहेत, पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फिक्स खून करील अशी धमकी देत आरोपी पोपट खामगळ याने पिडीत महिलेस दि. ११/०१/२०२५ रोजी पर्यंत खून करण्याची धमकी देवून मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिलेस आरोपीसोबत सोबत शारीरीक संबंध
ठेवण्यासाठी तयार कर असे आरोपीने पिडीत महिलेस सांगितले होते, पिडीत महिलेने त्याची मागणी पुर्ण न केल्याने तिला पुन्हा मारहाण करून पत्र्याच्या खोली जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व पिडीतेला त्या ठिकाणी डांबून ठेवले. पिडीत महिलेने जोडप्यातील महिलेच्या फोन वरून तिचे नातेवाईकास फोन करून सर्व झालेला प्रकार सांगितला. सदरचा प्रकाराची माहिती स्था.गु.शा.चे पथकाला मिळालेनंतर माळेगाव पोलीस स्टेशनकडील स्टाफ चे मदतीने दि. १२/०१/२०२५ रोजी दु.०३/३० वा.सुगास
पिडीतेची सुटका करणेत आली. झालेल्या प्रकाराबाबत पिडीत महिलेने आरोपी पोपट खामगळ याचेविरोधात माळेगाव पोलीस
स्टेशन गु.र.नं. ०९/२०२५ भा. न्या. सं. चे कलम ६४ (२) (m), ३०९ (६), १२७ (४), ११५ (२), ३५२,३५१(३) प्रमाणे गुन्हा नोंदविला
आहे. आरोपी पोपट धनसिंग खामगळ वय २५ वर्षे, रा. खामगळवाडी, ता. बारामती, जि. पुणे यास ताब्यात घेवून माळेगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.आरोपी पोपट धनसिंग खामगळ वय २५ वर्षे, रा. खामगळवाडी, ता. बारामती, जि. पुणे याचेवर बारामती शहर पो स्टे, येथे महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा तसेच माळेगाव पोस्टे येथे यापुर्वी जबरदस्तीने महिले सोबत शारीरीक संबंध करून लैंगिक अत्याचार
केल्याचा गुन्हा दाखल आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख,.पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगाव पो स्टे चे सपोनि सचिन लोखंडे, स्था.गु.शा.चे सपोनि कुलदीप संकपाळ, माळेगाव पोस्टे चे मपोसई संध्याराणी देशमुख, पोसई देवा साळवे, स्था. गु.शा. चे पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, माळेगाव पो स्टे चे अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, अर्चना बनसोडे,गोदावरी केंद्रे यांनी केली असून आरोपीस मा. न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेवून पुढील तपास माळेगाव पो स्टे चे पोसई श्री खटावकर हे करत आहेत.
No comments:
Post a Comment