बारामतीमध्ये हजारो टकारी समाज बांधवांच्या उपस्थित वधु वर मेळावा संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 14, 2025

बारामतीमध्ये हजारो टकारी समाज बांधवांच्या उपस्थित वधु वर मेळावा संपन्न..

बारामतीमध्ये हजारो टकारी समाज बांधवांच्या उपस्थित वधु वर मेळावा संपन्न..
बारामती :- बारामती टकारी समाज विकास संस्था अंतर्गत बारामती टकारी समाजाच्या वतीने टकारी  समाज वधु वर सूचक मेळावा व युवकांसाठी उधोजक मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी डॉ. सुधिर बाबुराव जाधव (लातुर)MA. BED SET, MBA DGDS LLB Phd यांनी उपस्थित युवक, महिला व समाज बांधवांना व्यवसाय कसे करावे त्यासाठी लागणारे कर्ज कसे मिळवावे यातून उधोग कसा करावा यासाठी सुंदर असे मार्गदर्शन केले त्याच बरोबर समाजातील वधू-वर यांच्यासाठी
राज्यस्तरीय मोफत वधू-वर व पालक परिचय मोफत मेळाव्यात  सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तसेच चहा नाष्टा, जेवण ची सोय केली होती, तसेच वधु वर यांचे नोंदणी फॉर्म जवळजवळ शेकडो जणांची नोंदणी झाली यावेळी या कार्यक्रमास हजारो समाज बांधव भगिनी उपस्थित होते,
बारामतीतील राधा कृष्ण मंगल कार्यालय बारामती याठिकाणी करण्यात आलेल्या मेळाव्यासाठी
राज्यातून  वधू-वरांची नोंदणी केली, या कार्यक्रमाचे आयोजन .  असे आयोजक  व संपर्क प्रमुख श्री. अनिल गायकवाड(मा. उपनगराध्यक्ष), श्री. संतोष जाधव(पत्रकार),शेखर गायकवाड,सुभाष जाधव(सरपंच),बाळासाहेब गायकवाड,गणेश गायकवाड,ओंकार जाधव, महेश गायकवाड,संदीप जाधव,संतोष गायकवाड,सयाजी गायकवाड,महेंद्र गायकवाड,अशोक जाधव, संजय गायकवाड,संजय जाधव,विलासतात्या गायकवाड,राहुल जाधव, किरण गायकवाड, लखन गायकवाड,चिंगप्पा जाधव,मयुर जाधव,अनिल जाधव सह अनेकांच्या वतीने उपस्थित समाज बांधवांचे  जाहीर सत्कार करून आभार मानले.

No comments:

Post a Comment