बारामतीतून मोक्का कारवाईतील मोरक्याला ठोकल्या बेड्या.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 15, 2025

बारामतीतून मोक्का कारवाईतील मोरक्याला ठोकल्या बेड्या..

बारामतीतून मोक्का कारवाईतील मोरक्याला ठोकल्या बेड्या..
बारामती:-  दहशत माजविणाऱ्या येनपूरे टोळीचा म्होरक्या पप्पू येनपूरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बारामतीतून बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) येनपूरे टोळीविरुद्ध कारवाई केली
होती.मोक्का कारवाई केल्यानंतर तो गेले दोन वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता. प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपूरे (वय ३०,रा. सच्चाईमातानगर, कात्रज) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण येनपूरे याच्यासह
साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांनी येनपूरेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई केली होती. कारवाईनंतर येनपूरे पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. येनपूरे मोबाइल संच वापरत नव्हता,
तसेच तो वास्तव्याचे ठिकाणही सतत बदलायचा.
त्यामुळे तांत्रिक तपासात त्याच्याविषयी फारशी माहिती मिळत नव्हती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मंगेश पवार, महेश बारावकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी त्याचा माग काढत होते. तपास सुरु असताना येनपूरे बारामतीतील नीरा वाघज परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या
माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा लावून येनपूरेला नीरा वाघज परिसरातून ताब्यात घेतले.ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ
पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता देवकाते,
राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन गाडे, अभिनय चौधरी,सचिन चोरमोले, सागर बोरगे, चेतन गोरे यांनी केली.

No comments:

Post a Comment