मुलाचा घेतला जीव...
बारामती:- मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की बारामती तालुक्यातील एका गावात अभ्यास करीत नाही याचा राग मनात धरुन बापानेच पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. 14 जानेवारीला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पियुष वय 9 वर्ष घरात असताना त्याचे वडील विजय भंडवलकर यांनी त्याला अभ्यासाविषयी ओरडा केला. यानंतर तू सारखा बाहेर खेळतोस, तुझी आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस,"असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे यावेळी त्यांची पत्नी शालन विजय भंडलकर हे देखील तिथे होती, पण तिने पतीला अडवले नाही.य
पोलिसांनी विजय गणेश भंडलकर, शालन विजय
भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर
(सर्व रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर
गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती
पोलिसांनी माहिती मिळताच विजय भंडलकर व
त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा आणि पुरावे
नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या
प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी एक प्लॉन तयार केला होता. त्यानुसार संतोष भंडलकर यांनी मुलाला निरा येथील एका डॉक्टरांकडे नेले. तिथे मुलाला चक्कर आल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी पियुष
मयत झाल्याचे सांगून त्याला प्राथमिक केंद्रात नेण्यास सांगितले. मात्र, त्या तिघांनी आपण केलेल्या गुन्हा बाहेर येईल या भीतीने या विषयी कोणाला कळू नये म्हणून अत्यंतविधी तयार करण्यात आली होती. विजय भंडलकर
यांच्या सांगण्यानुसार पियुष हा चक्कर येऊन पडल्याचे मयत मुलाची आई शालन भंडलकर हिने सांगितले असल्याचे कळतंय.
No comments:
Post a Comment