तिघांवर कोयत्याने सपासप वार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 3, 2025

तिघांवर कोयत्याने सपासप वार..

तिघांवर कोयत्याने सपासप वार..
पुणे :- वाढती गुन्हेगारी पाहता कोयता गॅंग चं प्रस्थ ज्यादा वाढलेलं दिसत आहे, नुकताच 
वैमनस्यातून सराइतांनी तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडीत घडली आहे. याप्रकरणी सराइतांसह साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अजय हरिसिंग परदेशी (वय ४४), जय अनिल परदेशी (वय २१) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सादिक महंमद शेख (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी),नूर नजीर शेख, इरफान शेख (दोघे रा. नाडेगल्ली, गणेश पेठ), सलीम कासीम तांबोळी, इम्रान उर्फ इम्मू सत्तार शेख
(दोघे रा. कोंढवा) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत सोनू उर्फ माँटी अनिल परदेशी (वय २७, रा.म्हसोबा मंदिराजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार परदेशी
ओळखीचे आहेत. यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते.बुधवारी मध्यरात्री आरोपींनी सोनू परदेशी याचे काका अजय आणि लहान भाऊ जय यांना कासेवाडी भागात अडवले. त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी काका आणि लहान भावाला सोडविण्यासाठी गेलेला सोनू याला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केले. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली.पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक आकाश थिटे तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment