६ जानेवारी रोजी चंदूकाका सराफ अँड सन्स कडून पत्रकारांचा सत्कार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 6, 2025

६ जानेवारी रोजी चंदूकाका सराफ अँड सन्स कडून पत्रकारांचा सत्कार...

६ जानेवारी रोजी चंदूकाका सराफ अँड सन्स कडून पत्रकारांचा सत्कार...
बारामती:-चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा लिमिटेड, एमआयडीसी शाखा यांच्यावतीने
पत्रकार दिनाच्या औचित्य साधून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मराठी पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेली सुवर्णपेढी "चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लिमिटेड" यांच्या वतीने बारामतीतील पत्रकारांचा सत्कार व सन्मान आज ६ जानेवारी रोजी एमआयडीसी शाखा या ठिकाणी आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आला.समाज परिवर्तन व प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा व योगदानाचा सन्मान करावा तसेच या निमित्ताने चंदुकाका सराफ अँड सन्स येथे ग्राहकांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध
आकर्षक योजना, उपक्रमाची माहिती द्यावी या भावनेतून सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व पायल महोत्सवाची स्टँडी चे
अनावरण करून करण्यात आले. त्यानंतर संतोष पोपट जाधव-अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ बारामती तालुका, श्री संदीप आढाव, सचिव बारामती तालुका मराठी पत्रकार संघ, श्री प्रणव तावरे, दैनिक प्रभात, श्री भारत गुलाब
तुपे, दैनिक प्रीतीसंगम बारामती व्यवस्थापक, श्री प्रमोद गणेश करचे, अल्फाज टाइम्स सोशल मीडिया, श्री सुनील शिंदे, संपादक पत्रकार बहुजन हितार्थ, श्री शुभम भीमराव गायकवाड, उपसंपादक महाराष्ट्राचे नेतृत्व, आसिफ शेख सर,
महाराष्ट्र न्यूज, श्री दीपक नाना वाबळे, जगतारा टाइम्स पुणे, सिकंदर शेख,पत्रकार यांचा सत्कार ब्रांच मॅनेजर श्री राहुल घोरपडेसर, अमित झेंडेसर
व गजेंद्र पालीवालसर यांनी केला कार्यक्रमाचे नियोजन मार्केट टीम ने केले.

No comments:

Post a Comment