धक्कादायक..भाचीच्या लग्नाच्या जेवणातच मामाने टाकलं विष...
धक्कादायक कृत्य केलं आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथे ही घटना घडली आहे.भाचीने आपल्या मर्जीविरोधात आठवड्याभरापूर्वीच गावातील मुलासोबत पळून जाऊन लग्न केलं, त्यामुळे बदनामीच्या रागातून मामाने संतापजनक कृत्य केलं आहे. लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात विषारी औषध
टाकलं, त्यामुळे लग्नाला आलेल्या पाहुण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला.महेश जोतीराम पाटील, असं या मामाचं नाव आहे.याप्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. तसंच या मामाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मामाला जेवणात विषारी औषध टाकताना आचाऱ्याने बघितलं, यानंतर दोघांमध्ये झटापट झाल्याचीही चर्चा आहे. आचाऱ्याच्या समोरच मामाने अन्नामध्ये विषारी औषध टाकलं. ही गोष्ट आचाऱ्याच्या लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment