धक्कादायक.. पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून एकदा नाही तर दोनदा लैंगिक अत्याचार.. - vadgrasta

Post Top Ad

Wednesday, February 26, 2025

धक्कादायक.. पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून एकदा नाही तर दोनदा लैंगिक अत्याचार..

धक्कादायक.. पीडितेच्या वैद्यकीय अहवालातून एकदा नाही तर दोनदा लैंगिक अत्याचार..
पुणे:-महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असल्याचे दिसत असून नुकताच पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे,
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही
बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली
आहे. पीडित तरुणीचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे, ससून रुग्णालयानं हा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे पाठवला आहे.वैदकीय अहवालामधून धक्कादायक बाब समोर आली
आहे, या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पीडितेवर एकदा नाही तर दोनदा लौंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल ससून रुग्णालयानं पोलिसांकडे पाठवला आहे.

No comments:

Post a Comment