दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर अजित पवार यांचे उत्स्फूर्त स्वागत..!
दिल्ली:- ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभात, दिल्लीतल्या ऐतिहासिक तालकटोरा मैदानात प्रवेश करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. मराठी सारस्वत, मराठी साहित्य प्रेमी, महाराष्ट्र प्रेमी आणि असंख्य मराठीजनांनी त्यांना गराडा घालत आत्मीयतेने संवाद साधला.
चार शतकांपूर्वी मराठा पराक्रमाची साक्ष देणाऱ्या या तालकटोरा मैदानाच्या ऐतिहासिक भूमीत, आज अजित पवार यांच्या लोकप्रियतेचा नवा अध्याय लिहिला गेला. मराठी संस्कृती आणि परंपरेच्या साक्षीदार असलेल्या या सोहळ्यात, महाराष्ट्राच्या विकासाचे नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाला दिल्लीत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मराठी अस्मितेचा गौरव ठरला!
No comments:
Post a Comment