बारामती शहरातील आमराई येथील प्रबुद्धनगर, वडकेनगर आणि बस स्टँड समोरील झोपडपट्टी परिसरात विजेचे खांब बसविण्यात आले..
बारामती: बारामती शहरातील आमराई येथील प्रबुद्धनगर, वडकेनगर आणि बस स्टँड समोरील झोपडपट्टी परिसरात 21 फेब्रुवारी 2025 रोजी विजेचे खांब (विद्युत खांब) बसविण्यात आले. याआधी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षामार्फत बारामती नगरपरिषदेकडे पाठपुरावा करून सदर झोपडपट्टी परिसरात विजेचे खांब बसविण्यात आले आहेत.
सदर झोपडपट्टी परिसर हा अत्यंत दाट लोकवस्तीचा असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहणारे नागरिक हे अनुसूचित जातीचे आहेत. गेली कित्येक दिवसांपासून झोपडपट्टी परिसरात योग्य ती काळजी घेऊन विजेचे खांब बसविण्यात यावेत याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षामार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याच प्रयत्नांना यश येत असून आज रोजी उपरोक्त ठिकाणी विजेचे खांब बसविण्यात आले आहेत.
मागील दिवसांत बारामती नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण झोपडपट्टी परिसराचा सर्वे करून विजेचे खांब बसविण्यासाठीच्या आवश्यक जागांची पाहणी करण्यात आली असून संपूर्ण झोपडपट्टी परिसरात विजेचे खांब बसविण्यात यावेत याकरिता बारामती नगरपरिषदेकडे जोमाने पाठपुरावा सुरू आहे.
सध्या बसविण्यात आलेल्या विजेच्या पोलमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि बारामती नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांचे देखील आभार मानले.
यावेळी मा. रविंद्र (पप्पू) सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा), मा. सुनील शिंदे (सचिव प. महाराष्ट्र), मा. रत्नप्रभा (ताई) साबळे (उपाध्यक्षा प. महाराष्ट्र महिला आघाडी), मा. अभिजीत कांबळे (बारामती शहराध्यक्ष), मा. पूनम (ताई) घाडगे (बारामती तालुकाध्यक्ष महिला आघाडी), मा. ऍड. तुषार ओव्हाळ (तालुका उपाध्यक्ष), तसेच मा. मोईन बागवान (पत्रकार), मा. मोहन शिंदे, मा. सूरज आहिवळे, मा. ऍड. अक्षय गायकवाड, मा. गणेश शिंदे, मा. अमर भंडारे, मा. श्रीकांत पाथरकर, मा. अक्षय मेमाणे, मा. निलेश शेंडगे, मा. सत्यजीत देवकाते, मा. ऋषी सोनवणे, मा. अफसर बागवान, मा. मोबिन बागवान, मा. शाहरुख बागवान, मा. विनोद काळे, मा. साहिल सोनवणे, मा. बाळा लोंढे, मा. युवराज लोंढे, मा. आदेश काळे, मा. लखन भोसले आदी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment