मुलींच्या आत्महत्येचं प्रमाण का वाढतेय?नामांकित महाविद्यालयातील मुली का पडतात बळी..?
बारामती(संतोष जाधव):-सध्या परीक्षा झाल्या तर काहीजणांच्या परीक्षा चालू आहे, याबाबतीत सर्वात जास्त टेन्शन मुलींनी घेतल्याचं समोर येत आहे आणि यातून आत्महत्या करणं किंवा तसा प्रयत्न करणं असे प्रकार वाढत चालले आहे, कदाचित पेपर अवघड गेले, आईबापाला शिक्षणाचा खर्च झेपेल का?अभ्यास करूनही आपल्याला पेपर अवघड गेले, क्लासेस व अँकेडमी मध्ये शिकणारे मुले मुली कॉफी करून पेपर सोडताना पहावयास कदाचित दिसत असेल,कारण सध्या तसा फंडा चालू असून अनेक क्लासेस व अँकेडमी वाले खात्री देतात आमच्याकडे ऍडमिशन घेतले तर आम्ही मुलांना पास करून देऊ शकतो हे कशाच्या आधारे तर तसा शिक्षणाचा बाजार झाला असून किती तरी उदाहरणे देऊ शकतो आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षा घेणाऱ्या क्लासेस व अँकेडमी ची कुंडली मांडली जाऊ शकते.
*महत्वाचा विषय राहतो तो आत्महत्या का होतात व त्याची कारणे काय?*
तर काही घटना अश्या घडल्यात की त्या धक्कादायक आहे, शिकायला आलेल्या बाहेरील गावाहून मुली ज्या महाविद्यालयात शिकण्यासाठी येतात त्या महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या क्लासेस किंवा अँकेडमी मध्ये ऍडमिशन घेतात तर काही मुली ग्रुप बनून रूम भाड्याने घेतात आणि आपले शिक्षण घेत असतात मात्र अश्यावेळी काही घटना अश्या घडल्या आहे की, संगत नडते आणि किशोरवयीन वयात नको ते पाऊल वाकडे पडते यातून पुढे जे घडते ते भयानक असतं,कुणी प्रेमात अपेक्षा भंग झाले म्हणून तर कुणी टवाळखोर मुलं अश्या मुलींना हेरून त्याचा पाठलाग करून त्यांना नको त्या वाममार्गाला लावतात अश्या घटना घडत आहे यालाच बळी पडून देखील अनेक मुलींनी आत्महत्या व आत्महत्याचा प्रयत्न केल्याचं बातम्या पहावयास मिळत आहे,अश्या घटना घडत असताना त्याला जबाबदार कुणाला धरायचे बाहेर गावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना की, त्यांना शिकायला पाठविणारऱ्या आईबापाला की, शिक्षण देणाऱ्या संस्था, महाविद्यालयाला की जे अश्या मुलींना हेरून त्यांना नाहक त्रास देणाऱ्या टवाळखोर मुलांना असं एक नव्हे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहे, कायदा सुव्यवस्था बिघडत तर चालला नाही ना अशी काही वेळा शंका निर्माण होताना दिसत आहे, नामांकित महाविद्यालयात अश्या अनेक घटना घडल्या असल्याचे चर्चा ऐकव्यास मिळत आहेत,तर काही घटना संस्थेची, महाविद्यालयाची बदनामी होऊ नये यासाठी असे प्रकरण दाबले गेले असल्याचे कळतंय,पेपर अवघड गेले,रॅगिंग,टवाळखोराचा त्रास, आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण होत नसल्याने देखील नको ते पाऊल उचलले गेले. नुकताच काही दिवसांपूर्वी नामांकित महाविद्यालयात शिकत असणाऱ्या मुलीने आत्महत्या केली असतानाच पुन्हा काल परवा एका मुलीने आपल्या गावाकडे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी प्रसिद्ध झाली धक्कादायक बाब म्हणजे ह्या दोन्ही मुली एकाच महाविद्यालयात शिकत होत्या असं कळतंय, पण याचा शोध पोलीस घेत आहे, आणि तो घेतलाच पाहिजे बदनामी होऊ नये म्हणून प्रकरणे दाबले जात असेल तर याला काय म्हणावं असा प्रश्न सर्वसामान्याना पडत आहे, आई वडील काबाड कष्ट करून आपल्या मुलींना शिकविण्यासाठी धडपड करीत असताना असं आत्महत्याचं पाऊल उचललं जाणं हे चिंताजनक आहे यासाठी काही ठोस पाऊलं उचलणे गरजेचं आहे. समुपदेशन करणं गरजेचं आहे, कॉलेज, शाळा, महाविद्यालयात जाऊन अशी जनजागृती करून मुलींवर होत असलेले अत्याचार त्यांच्यावर येत असलेला दबाव, त्यांची मानसिकता जाणून घेतली पाहिजे.
No comments:
Post a Comment