साडे आठ लाख रूपये किंमतीच्या ८३ शेळया चोरणा-या सराईत गुन्हेगार टोळीच्या मुसक्या आवळुन एकुण ११ गुन्हे उघकीस.. - vadgrasta

Post Top Ad

Tuesday, March 25, 2025

साडे आठ लाख रूपये किंमतीच्या ८३ शेळया चोरणा-या सराईत गुन्हेगार टोळीच्या मुसक्या आवळुन एकुण ११ गुन्हे उघकीस..

साडे आठ लाख रूपये किंमतीच्या ८३ शेळया चोरणा-या सराईत गुन्हेगार टोळीच्या मुसक्या आवळुन एकुण ११ गुन्हे उघकीस..
इंदापूर:- इंदापुर तालुक्यातील साडे आठ लाख रूपये किंमतीच्या ८३ शेळया चोरणा-या सराईत गुन्हेगार टोळीच्या मुसक्या आवळुन एकुण ११ गुन्हे उघकीस आणले-स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कारवाई इंदापुर व वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेले काही दिवसांपासुन वाढलेली शेळी
चोरीचे प्रमाणाकडे लक्ष देवुन सदर शेळी व बोकड चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी मा. पंकज देशमुख , पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.गणेश बिरादार साो, अपर पोलीस अधिक्षक,
बारामती विभाग, मा. डॉ. सुदर्शन राठोड , उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांनी उघडकीस आणणेसाठी सुचना देवुन त्याप्रमाणे कारवाईचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे मा. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील सपोनि कुलदीप संकपाळ, तसेच सपोफौ बाळासाहेब कारंडे,पोहवा अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, निलेश शिंदे असे इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना पोहवा स्वप्नील अहिवळे यांना गोपनीय बातमीदार यांचेमार्फत बातमी मिळाली की, वालचंदनगर व इंदापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेळी व बोकड चोरी करणारी टोळी यांनी आंबळे रेल्वे स्टेशन येथुन कॉपर वायर चोरुन आणलेल्या आहेत व ते वरकुटे ता. इंदापुर गावाचे हद्दीत तलावाच्या जवळ बसले आहेत.सदरची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरील स्टाफने सदर ठिकाणी जावुन पाहणी करुन खात्री केली असता मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाच इसम काही तरी जाळत बसल्याचे दिसले. त्यावेळी त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते सर्वजण पळुन जावु लागले. त्यापैंकी एका इसमास पाठलाग करुन शिताफीने पकडुन त्याचे नाव विचारता त्यानी त्याचे नाव रोहित दत्तात्रय कटाळे, वय २० वर्षे, रा. मौजे तुपेवस्ती, उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे असे सांगितले. त्यास विश्वसात घेवुन शेळी व बोकड चोरी बाबत विचारपुस केली असता त्यांने त्याचे साथीदार नामे १) साहिल विलास चौधरी, वय - २० वर्षे, रा. बोधेवस्ती, उरळी कांचन, ता. हवेली,जि. पुणे, २) वैभव ऊर्फ गोटया तरंगे, रा. दत्तवाडी, उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, ३) सचिन अरुण कांबळे, रा. तळवाडी चौक, सिध्दीविनायक हॉस्पीटल मागे, उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे,४) खंडु महाजन रा. वडापुरी, ता. इंदापुर, जि. पुणे असे आम्ही सर्वांनी मिळुन सचिन कांबळे याच्या मालकीचे मारुती सुझुकी सुपर कॅरी क्रमांक एम.एच ४२ बी. एफ ६०८९ याचा वापर करुन वालचंदनगर, इंदापुर व यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शेळी चोरीचे गुन्हे केले आहेत. तसेच वरील आरोपनी गुन्हा करताना वापरलेला मारुती सुझुकी सुपर कॅरी क्रमांक एम.एच ४२ बी.एफ ६०८९ ही ताब्यात घेवुन जप्त करण्यात आली आहे.सदर ताब्यात घेतलेल्या आरोपीकडुन त्यांनी कोठे कोठे गुन्हे केल्याची माहिती घेतली असता वालचंदनगर, इंदापुर व यवत पोलीस स्टेशन येथील खालील प्रमाणे दाखल असलेले ११ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
 १. वालचंदनगर पोलीस स्टेशन, गु. रजि. नंबर ७१ / २०२५ बी. एन. एस ३०३ ( २ )
२. वालचंदनगर पोलीस स्टेशन, गु. रजि.नंबर ९७/२०२५ बी. एन. एस ३०३ (२)
३. वालचंदनगर पोलीस स्टेशन, गु. रजि.नंबर ८०/२०२५ बी. एन. एस ३०३ ( २ )
४. वालचंदनगर पोलीस स्टेशन, गु. रजि.नंबर २५/२०२५ बी. एन. एस ३०३(२)
५. वालचंदनगर पोलीस स्टेशन, गु. रजि. नंबर २८२ / २०२४ बी. एन. एस ३०३ (२)
६. वालचंदनगर पोलीस स्टेशन, गु. रजि नंबर ५१७ / २०२४ बी. एन. एस ३०३ (२)
७. वालचंदनगर पोलीस स्टेशन, गु. रजि. नंबर ४४ / २०२४ भा.द.वि ३७९
८. इंदापुर पोलीस स्टेशन, गु. रजि.नंबर १८६/२०२५ बी. एन. एस ३०३ (२),
९. इंदापुर पोलीस स्टेशन, गु. रजि. नंबर ११९ / २०२५ बी. एन. एस ३०३ (२),
१०. यवत पोलीस स्टेशन, गु. रजि. नंबर ११३ / २०२५ बी.एन.एस ३०३ (२)
११.यवत पोलीस स्टेशन, गु. रजि.नंबर ९७/२०२५ बी.एन.एस ३०३ (२)
असे वरील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यानंतर सदर ताब्यात घेतलेला आरोपी रोहित
कठाळे याच्या मदतीने त्याचे साथीदार नामे साहिल चौधरी यास उरळी कांचन येथुन ताब्यात घेतले असुन वरील दोन्ही आरोपींना वालचंदनगर पोलीस स्टेशन गु. रजि.नंबर ७१ / २०२५ बी. एन. एस ३०३ (२) या गुन्हयात अटक केली असुन त्यांना दिनांक २५/०३/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.सदर गुन्हामधील आरोपी नामे वैभव तरंगे याचेवर पुणे शहर व पुणे ग्रामीण मध्ये चोरीचे ११ गुन्हे दाखल असुन लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्फत त्याचा तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. आरोपी रोहित कटाळे याचेवर दौंड पोलीस स्टेशन येथे चोरीचा ०१ गुन्हा दाखल आहे.सदरची कामगिरी मा. श्री. पंकज देशमुख , पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार , अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग, मा.श्री. डॉ.सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. श्री. अविनाश शिळीमकर,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा विभाग, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि दत्ताजी मोहिते, तसेच
वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार डुणगे, सपोफौ बाळासाहेब कारंडे,पोहवा स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगे, निलेश शिंदे, राजु मोमीन, अतुल ढेरे, योगेश नागरगोजे, अमोल शेंडगे यांनी पार पाडली आहे.

No comments:

Post a Comment