"इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक, "; युगेंद्र पवार.. *शोएब बागवान मित्र परिवाराच्या वतीने “दावत-ए-इफ्तार" आयोजित कार्यक्रम* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 26, 2025

"इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक, "; युगेंद्र पवार.. *शोएब बागवान मित्र परिवाराच्या वतीने “दावत-ए-इफ्तार" आयोजित कार्यक्रम*

"इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक, "; युगेंद्र पवार..
*शोएब बागवान मित्र परिवाराच्या वतीने “दावत-ए-इफ्तार" आयोजित कार्यक्रम*
बारामती:- शोएब बागवान मित्र परिवाराच्या वतीने “दावत-ए-इफ्तार" आयोजित
कार्यक्रम 'इफ्तार पार्टी'चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी "मुस्लिम धर्मियांच्या
पवित्र रमाजन निमित्तानं होणारी 'इफ्तार पार्टी' म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक
आहे. असे युवकांचे युवा नेते युगेंद्र पवार म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून शेरे-ए-
म्हैसूर यंग सर्कल बारामती, शोएब (भाई) बागवान मित्र परिवाराच्या वतीने “दावत-
ए-इफ्तार” हा स्तुत्य उपक्रम करतोय. सध्या देशात हिंदू मुस्लिम या दोन समाजात
तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकावून त्यांना दंगली करण्यासाठी प्रवृत्त केलं
जाण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, आपण आपल्या घरातील तरुणांना यापासून दूर ठेवलं
पाहिजे," असं वक्तव्य शेरोशायरीच्या माध्यमातून सेक्युलर रायटर संपादक आसिफ
खान यांनी केलं. सध्या देशातील परिस्थिती ही हिंदू मुस्लिम वाद विवाद
करण्यासाठी सरसावली असताना, गेल्या काही वर्षांपासून आरबाज बागवान शेरे-ए-
म्हैसूर यंग सर्कल बारामती, शोएब (भाई) बागवान मित्र परिवाराच्या वतीने जातीय
सलोखा जोपासलाय. हुजूर रहमतुलिल आलमीन ईद-ए-मिलादुन्नबी (स.) संपूर्ण
विश्वासाठी रहमत आहे. इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा
(स.अ.व.स . ) यांच्या जयंती बरोबर छत्रपती शिवाजी महाराज (शिवजयंती)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) यासह मानवतावादी संदेश
देणाऱ्या सर्वच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम या शेरे-ए- म्हैसूर यंग
सर्कल बारामती, आरबाज बागवान, शोएब (भाई) बागवान मित्र परिवाराच्या वतीने
विविध उपक्रम राबवले जातात.
यावेळी मंचावर मा. श्री युगेंद्र श्रीनिवास पवार साहेब, ऍड सुधीर पाटसकर,
मा. श्री माजी विरोधी पक्षनेते बारामती नगरपरिषद सुनील सस्ते, मा. श्री ज्येष्ठ माजी
नगरसेवक सुभाष (आप्पा) ढोले, माजी उपनगराध्यक्ष भारत (दादा) अहिवळे मा. श्री
सत्यव्रत (सोनू ) काळे, ऍड संदीप गुजर, ऍड आकाश दामोदरे, हाजी फिरोज बागवान,
अल्ताफ इमाम हुसेन बागवान, सामाजिक ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी दरवर्षी मुस्लिम
बांधवांसाठी आमराई येथे 'दावत - ए - इफ्तार " " इफ्तार पार्टी'ची आयोजन करणारे शुभम
अहिवळे, मा. श्री राजेंद्र ( दादा ) पवार हे कार्यक्रमाच्या अगोदर उपस्थित होते. सेक्युलर
रायटरचे संपादक, माजी नगरसेवक आसिफ खान यांनी एक शेर ऐकवत म्हणाले
की, मैं मुस्लिम हूँ, तू हिन्दू है, हैं दोनों इंसान, ला मैं तेरी गीता पढ़ लूँ, तू पढ़ ले कुरान, अपने तो दिल में है बस एक ही अरमान, एक थाली में खाना खाये सारा
हिन्दुस्तान।,बारामती शहरातील धर्मगुरू मौलाना आयुब, राजकीय, शैक्षणिक, समाजिक
क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते आणि हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं “ दावत-ए-इफ्तार"
कार्यक्रमात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment