ड्रीम्स डिझायनर्स फाउंडेशन, आयोजित "बारामतीची लाडकी सौभाग्यवती २०२५" व " यशस्वी उद्योजक २०२५" सन्मान सोहळा या भव्य सौंदर्य व प्रतिभा स्पर्धेस बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
बारामती:-ड्रीम्स डिझायनर्स फाउंडेशन, बारामती यांच्या वतीने "बारामतीची लाडकी सौभाग्यवती २०२५" आणि "यशस्वी उद्योजक पुरस्कार २०२५" हा भव्य सौंदर्य व प्रतिभा स्पर्धेचा कार्यक्रम दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ग.दि.मा. सभागृह, बारामती येथे संपन्न झाला. महिला सक्षमीकरण आणि महिला दिनाच्या विशेष निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम सुपरहिट ठरला. बारामतीतील महिलांनी आपल्या सौंदर्य, आत्मविश्वास आणि कलागुणांची चमकदार झलक सादर केली. या स्पर्धेत एकूण २१ स्पर्धकांनी भाग घेतला आणि आपल्या अनोख्या कौशल्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रेक्षकांनी आणि परीक्षकांनी या स्पर्धेची स्तुती केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व प्रमुख उपस्थिती व या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुनंदा वहिनी पवार, ऍड नेहा कोकरे,डॉ.नंदिता ताई देवकाते आणि स्नेहलताई दगडे यांनी भूषवले.
तसेच, प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. पौर्णिमा ताई तावरे, सौ. नेहा भाभी सराफ, सौ. सीमा ताई चव्हाण आणि सौ. सुनीता भाभी शाह यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली..
स्पर्धेच्या विजेत्या:
"बारामतीची लाडकी सौभाग्यवती २०२५" ची विजेती ठरली...सौ. इराम पठाण फर्स्ट रनर अप च मान मिळवला सौ.हर्षला व्होरा यांनी.तसेच सेकंड रनर ठरल्या सौ .साक्षी खत्री.
या कार्यक्रमात "यशस्वी उद्योजक पुरस्कार २०२५" प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्विकारणाऱ्या सर्व प्रतिष्ठित उद्योजक व्यक्ती उपस्थित होत्या..
सौ.नेहा भाभी सराफ ..
(डायरेक्टर चंदुकाका सराफ & सन्स )
सौ.हेमलता परकाळे..
( डायरेक्टर ऑफ स्वराज फर्निचर)
सौ.रजनीगंधा रसाळ..
(रिसर्च & डेव्हलपमेंट हेड सर्वस्व मसाले & ड्रायफ्रुट्स)
सौ.अमृता माघाडे..
(CEO ऑफ मॉडर्न किचन)
सौ.संगीता सावंत..
(संचालिका–हॉटेल भन्नाट)
सौ.सोनाली सावंत..
(संचालिका – हॉटेल राजवाडा पार्क)
सौ. शिखा मोता
(प्रॉपरायटर ऑफ मोता डेकोर)
सौ.सपना ननवरे
(संचालिका – वैष्णवी ग्राफिक्स)
सौ.सुलभा पालकर
(पालकर & कंपनी)
सौ.निधी मोता
(प्रॉपरायटर – वॉयला वुमेन्स वर्ल्ड)
सौ.विद्या वाघमोडे
(कॉर्नर मोबाईल)
श्रीमती कौशल्या पोटे
(प्रॉपरायटर– बालाजी ऑईल इंडस्ट्रीज)
सौ.रोहिणी रमेश शिर्के
(हॉटेल रॉयल इन)
श्री.मांडके ब्रदर्स
(शिवम फोटो)
श्री.ओमप्रकाश यादव
(पुणे फॅशन)
श्री.रामलाल
(क्यारा एक्स्लुसिव अविन्या)
श्री.योगेश नालंदे व
श्री.नाना साळवे
(योद्धा पब्लिसिटी)सौ.पूजा देवकाते
(प्रॉपराटर पी.डी. ज्वेलस)
या सर्वांना आयोजकांच्या हस्ते 2025 चा *यशस्वी उद्योजक पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा निष्पक्ष आणि न्याय्य पद्धतीने परीक्षक सौ. संगीता ताई काकडे, सौ. नयन माने आणि कु. ऐश्वर्या शिंदे यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली.
या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते . चंदूकाका सराफ & सन्स
तसेच सहप्रायोजक होते
सर्वस्व मसाले & ड्रायफ्रूट्स, हॉटेल राजवाडा, स्वराज फर्निचर, मोटा डेकोर, मॉडर्न किचन, क्यारा एक्सक्लुझिव्ह अविन्या, वैश्नवी ग्राफिक्स, हॉटेल रॉयल इन, व्होइला वुमेन्स वर्ल्ड, कॉर्नर मोबाईल, पालकर & कंपनी, शिवम फोटोज, बालाजी ऑइल इंडस्ट्री.. तसेच मीडिया पार्टनर योद्धा पब्लिसिटी..
या सर्वांनी या कार्यक्रमास आपले बहुमूल्य योगदान दिले यासाठी ड्रीम्स डिझाईनर्स फाउंडेशन टीम यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या भव्य आणि यशस्वी कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय *"पॉवर ऑफ ३ वुमेन्स" फेम –सौ. अस्मिता फाळके,सौ.दर्शना जैन आणि सौ. गीता पोटे* यांना जाते. त्यांच्या अभूतपूर्व मेहनतीमुळे हा कार्यक्रम बारामतीकरांसाठी संस्मरणीय ठरला.
ड्रीम्स डिझायनर्स फाउंडेशनचे आयोजक यांनी मुख्य प्रायोजक व सर्व सह प्रायोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या बहुमूल्य योगदानामुळे आणि पाठिंब्यामुळे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडला.
हा कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आणि बारामतीकरांनी त्याचे भरभरून कौतुक केले. भविष्यातही असेच उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
*युनुस इनामदार यांनी स्टेज शो कोरिओग्राफी केली होती*
No comments:
Post a Comment