बारामती येथे भारतीय बेसबॉल महिला संघाच्या नवनिर्वाचित कर्णधार रेश्मा पुणेकर यांचा सत्कार...
बारामती:-दि. 30/03/2025 रोजी बारामती येथे WDSO- वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन आयोजित विश्वमाता अहिल्यादेवी होळकर यांची साप्ताहिक पूजा आरती दर रविवारी सकाळी 11.00 वाजता आयोजित केली जाते. गुढीपाडवा स्पेशल पूजा व आरती आज असल्याने या आरतीला विशेष महत्व होते. श्री. अमृत नेटके शहर अध्यक्ष बारामती शहर मातंग समाज संघटना बारामती, खजिनदार बारामती तालुका वकील संघटना, श्री. अनिल दत्तात्रय आटोळे अध्यक्ष बारामती तालुका दक्षता समिती बारामती, श्री. उदयसिंह नाना पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन, WDSO चे मार्गदर्शक श्री. सुनील देवकाते (भैय्या ), बारामती वकील संघटनेचे उपाध्यक्ष सचिन कोकणे, सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई करे यांचे हस्ते अहिल्यादेवी प्रतिमेचे पूजन करण्यात आले, सर्वांचे हस्ते आरती झाली. समाजातील प्रश्नावर चर्चा करण्यात आली.WDSO - वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन तर्फे विश्वमाता अहिल्यादेवी होळकर यांची साप्ताहिक पूजा आणि आरतीचे औचित्य साधत भारतीय बेसबॉल महिला संघाच्या कर्णधार पदी निवड झाल्याबद्दल रेश्माताई पुणेकर यांचा तसेच प्रमुख अतिथी म्हणून शरदचंद्र पवार गटाचे बारामती शहर अध्यक्ष सोनुभैय्या काळे यांचा सत्कार करण्यात आला, गुढीपाडव्याच्या निमित्ताने WDSO - वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दीपक कातुरे यांनी नवीन गाडी घेतली,त्या गाडीचे पूजन करण्यात आले.प्रमुख उपस्थितीत त्यावेळी शरदचन्द्रजी पवार साहेब गटाचे बारामती शहर अध्यक्ष सोनुभैय्या काळे, बारामती नगर परिषदेचे गटनेते दिपकसाहेब मलगुंडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती भाऊसाहेब करे, बारामती तालुका दक्षता समितीचे अध्यक्ष अनिलराव आटोळे, बारामती शहर मातंग समाज अध्यक्ष व बारामती तालुका वकील संघटना खजिनदार अमृत नेटके , WDSO चे मार्गदर्शक सुनील देवकाते (भैय्या ), WDSO - वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष बबन आटोळे सर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिपक कातुरे, मार्गदर्शक गजानन भगत, मार्गदर्शक महेंद्र खटके, पुणे जिल्हा नेते अनिल आवाळे, मार्गदर्शक तानाजी मराडे सर, पुणे जिल्हा अध्यक्ष उदयसिंह नाना पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष निखिल बाराते, जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद वाघमोडे, शेळके साहेब, स्वातीताई करे, सविता आटोळे, सोनाली कातुरे, स्वाती कातुरे व इतर बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment