अल्पवयीन शालेय विदयार्थीनीचा फोटो वअश्लिल मजकुराची स्टोरी व्हायरल प्रकरणी एकास अटक.. - vadgrasta

Post Top Ad

Tuesday, April 1, 2025

अल्पवयीन शालेय विदयार्थीनीचा फोटो वअश्लिल मजकुराची स्टोरी व्हायरल प्रकरणी एकास अटक..

अल्पवयीन शालेय विदयार्थीनीचा फोटो व
अश्लिल मजकुराची स्टोरी व्हायरल प्रकरणी एकास अटक..
बारामती:- सोशल मीडियावर एका प्रकरणात इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवून
अल्पवयीन शालेय विदयार्थीनीचा फोटो व
अश्लिल मजकुराची स्टोरी व्हायरल केल्याची
घटना बारामती तालुक्यातून समोर आली आहे.
मुलीची बदनामी करणाऱ्या त्या युवकाला
ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने
गुन्ह्याची कबुली दिली असून माळेगाव पोलीसांनी
युवकाला अटक केले आहे. मिळालेल्या
माहितीनुसार पवन राजेंद्र क्षिरसागर (वय 21)
रा. ढाकाळे (ता. बारामती) असे अटक करण्यात
आलेल्या युवकाचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनी
स्वतःच्या इन्स्टाग्राम आयडी वरती कुटुंबीयांचे
फोटो शेअर केले होते. त्याच फोटोचा स्क्रीन शॉट
काढून फोटोचे वापर करत पवन क्षीरसागरने
नवीन इन्स्टाग्राम आयडी उघडून नववीत शिक्षण
घेणाऱ्या मुलीचे फोटो व त्यावर अश्लील,
लिखाण करून ते व्हायरल केले होते. इन्स्टाग्राम
व फेसबुक या समाजमाध्यम चालविणाऱ्या
मेटा प्लॅटफॉर्म या अमेरिकास्थित जागतिक
कंपनीच्या कार्यालयाकडे संबंधित इन्स्टाग्राम
खात्याची माहीती मिळणेकामी पत्रव्यवहार
केला होता. त्यानुसार त्यांच्या कार्यालयाकडून
माहीती प्राप्त करुन घेतली, माहीतीच्या
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध
घेण्यात माळेगाव पोलिसांना यश आले आहे.
मात्र, यापुढे मुलींनी सावधानता बाळगण्याचे  आवाहन पोलिसांनी केले आहे. माळेगाव
पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राच्या गावातील
इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन
शालेय मुलीचा फोटो वापरुन त्या फोटोवर
तीच्या चारित्र्या विषयी बदनामी होईल, असे
जाणीवपूर्वक अश्लिल स्वरुपाचे मजकुर लिहुन
त्याची इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवल्याचा प्रकार
संबंधित शालेय विदयार्थिनीच्या कुटुंबियांच्या
निदर्शनास आला. त्यानुसार विदयार्थिनीच्या
वडीलांनी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली
होती.माळेगाव पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा
नोंदविला होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक
वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.
आरोपीला बारामती न्यायालयात हजर केले
असता गुन्हयाच्या पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment