बापरे..बारामती तालुक्यात मुली सुरक्षित आहेत का? शाळकरी मुलीची आत्महत्या..
बारामती:-गेल्या काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर मुलीची बदनामी होईल असं कृत्य घडले,तर एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींनी आपल्या गावाकडं जाऊन आत्महत्या केली त्याचं कारण उघडकीस आलं नसले तरी अश्या घटना का घडतात याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत असताना नुकताच बारामती तालुक्यातील एका शाळकरी मुलीनी आत्महत्या केल्याचं उघड झाले असून याबाबत मिळालेली माहिती अशी की,
तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने एका गावात येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती.
सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०७,७८,२९६,३५२, ३५१ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.
No comments:
Post a Comment