भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..
बारामती, दि. १४: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त इंदापूर रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास तहसिलदार गणेश शिंदे आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
श्री. भुसे यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालय व ग्रंथालय या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करणेत आले. शारदाप्रांगण येथून नगर परिषद शाळांच्यावतीने ग्रंथदिंडी काढण्यात आली.
संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 'घर घर संविधान' उपक्रमाअंतर्गत
भारतीय राज्यघटना, नागरिकांचे घटनात्मक अधिकार व कर्तव्याबद्दल जनजागृती करण्यासाठी शाळेमार्फत प्रभातफेरीचे आयोजन, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
*चौकट*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, 'एमआयडीसी'चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल आदी मान्यवरांनी यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी,विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरीक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment