बारामती येथे विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक पूजा व आरती संपन्न...
बारामती:-दिनांक 6/04/2025 रोजी बारामती येथे WDSO- वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन आयोजित विश्वमाता अहिल्यादेवी होळकर यांची साप्ताहिक पूजा आरती सकाळी 11.00 वाजता संपन्न झाली. प्रतिमेचे पूजन कार्क्रमाचे पाहुणे छत्रपती उद्योग समूह व राजवाडा पार्क चे मालक आनंद सावंत यांचे हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश अहिवळे,बारामती तालुका प्राथमिक शिक्षक समिती चे तालुका अध्यक्ष श्री. सचिन हिलाळ,अंगणवाडी शिक्षिका जळगाव सुपे श्रीम.अरुणा महेंद्र खोमणे, चंद्रप्रभ नागरी पतसंस्था बारामतीचे सचिव श्री. मछिंद्र गोपीनाथ खोमणे,WDSO वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय सचिव श्री. प्रा.अजय गाढवे सर, VJNT राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली चे अध्यक्ष श्री. दिलीप गाडेकर,उरुळी कांचन उद्योजक श्री.प्रकाश धुकटे, उरुळी कांचनचे उद्योजक श्री प्रवीण जुन्नरकर यांचे हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेची पूजा व आरती करण्यात आली.
WDSO - वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन तर्फे विश्वमाता अहिल्यादेवी होळकर यांची साप्ताहिक पूजा आणि आरतीचे औचित्य साधत बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी WDSO- वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे राज्य समन्वयक पदी मछिंद्र गोपीनाथ खोमणे, पुणे जिल्हा महिला संघटक पदी अरुणा खोमणे तरी डॉक्टर असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. प्रवीण मोकाशी यांची नवीन पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थितीत छत्रपती उद्योग समूह व राजवाडा पार्क चे मालक आनंद सावंत, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश अहिवळे,बारामती तालुका प्राथमिक शिक्षक समिती चे तालुका अध्यक्ष श्री. सचिन हिलाळ,अंगणवाडी शिक्षिका जळगाव सुपे श्रीम.अरुणा महेंद्र खोमणे, चंद्रप्रभ नागरी पतसंस्था बारामतीचे सचिव श्री. मछिंद्र गोपीनाथ खोमणे, VJNT राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हवेली चे अध्यक्ष श्री. दिलीप गाडेकर,उरुळी कांचन उद्योजक श्री.प्रकाश धुकटे, उरुळी कांचनचे उद्योजक श्री प्रवीण जुन्नरकर, WDSO चे मार्गदर्शक सुनील देवकाते (भैय्या ),मार्गदर्शक महेंद्र खटके, WDSO - वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष बबन आटोळे सर, राष्ट्रीय सचिव अजय गाढवे सर, पुणे जिल्हा नेते अनिल आवाळे, डॉक्टर असोसिएशन चे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रवीण मोकाशी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष निखिल बाराते, जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद वाघमोडे, मयूर पानसरे, अनिकेत मारकड व इतर बांधव उपस्थित होते.
No comments:
Post a Comment