बारामतीत एका युवकाला तीन युवकांनी केली बेदम मारहाण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 5, 2025

बारामतीत एका युवकाला तीन युवकांनी केली बेदम मारहाण..

बारामतीत एका युवकाला तीन युवकांनी केली बेदम मारहाण..
बारामती :- बारामतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये काउंटरवर बसलेल्या एका युवकाला तीन युवकांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात
वायरल झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
दरम्यान मारहाण करणारे ते युवक इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून
त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून, पोलिसांनी त्यांना अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस
अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली तर नेमके मारहाणीचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून झालेली मारहाण ही अमानुषपणे झाली आहे तर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक शासन केले जाईल तसेच यापुढे अशा घटना घडू नयेत
यासाठी कायदेशीर उपाय योजना करीत असल्याचे मत उपविभागीय पोलिस
अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी माहिती दिल्याचं कळतंय.

No comments:

Post a Comment