कलाशिक्षकांच्या कलाकृतींचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन..
बारामती:-नटराज नाट्य कला मंदिर बारामती यांच्या माध्यमातून कलाकारांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळावे यासाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
बारामतीतील कलाशिक्षक आणि विविध हौशी कलाकारांनी काढलेली 90 चित्रे या प्रदर्शनात आहेत.यावेळी अजित पवारांनी प्रत्येक कलाकाराच्या कलाकृतींचे निरीक्षण करत कलाकारांना स्वतः सही करून सन्मानपत्र दिल्याने सर्व कलाकार भारावून गेले.
कलाशिक्षक अतुल गायकवाड व व्यंगचित्रकार शिवाजी गावडे यांनी अजित पवारांचे काही क्षणात रेखाटलेले चित्र पाहून अजित पवारांनी दोघांचेही कौतुक केले.
नटराज नाट्य कलामंदिरच्या माध्यमातून बारामतीतील कलाकारांना कलाकारकट्टा नावाचे मोफत व्यसपीठ जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी उपलब्ध करून दिले असून कलाकारांना विविध सुविधाही पुरवल्या जातात.
मनोज कुंभार यांनी स्वागत केले तर भारत काळे यांनी प्रदर्शनाची माहिती दिली.
प्रदर्शन दि.06/04/2025 ते 09/04/2025 पर्यंत सकाळी 10 ते दु.1 व सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत नटराज नाट्यकला मंदिर बारामती येथे सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे.
नटराज नाट्य कलामंदिरच्या सर्व सदस्यांनी तसेच सर्व कलाकारांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment