वीस गुन्ह्यात असलेला तोतया पोलिसाच्या आवळल्या मुसक्या..
पुणे:-नुकताच वीस गुन्ह्यात असलेला तोतया पोलीस अटक झाला असून ह्या पोलीस असल्याची बतावणी करत लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २० गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला असून, २९ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक आणि लुटमार केल्याचे उघड झाले आहे. हे सर्व गुन्हे त्याने अवघ्या दीड वर्षात केले आहेत. ओळख लपविण्यासाठी तो प्रत्येक गुन्हा हेल्मेट घालून करत होता.जफर शहाजमान ईराणी (४१, रा. लोणीकाळभोर, पठारे वस्ती) असे त्याचे नाव आहे.लकब हेरून पटवली ओळख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जफर हा सराईत गुन्हेगार आहे. आतापर्यंत त्याच्यावर पुण्यासह इतर जिल्ह्यांत ७० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तो २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला होता. गुन्हे करताना तो हेल्मेट काढत नव्हता. त्याचबरोबर चोरीची गाडी नंबर बदलून वापरायचा. एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो दिसून आला. त्याची चालण्याची आणि बोलण्याची लकब हेरून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी २०१७ मध्ये जफरला अटक केली होती. त्या वेळी त्याच्या घरातून दोन किलो सोने आणि ६४ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती.असा सापडला जाळ्यात
मावशी मी पोलीस आहे... तुमच्या इथे चोरी झाली आहे. तुमच्या गळ्यातील गंठण आणि हातातील अंगठी पिशवीत ठेवा, असे म्हणत महिला विरोध करत असतानाही त्याने जबरदस्तीने ऐवज हिसकावला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे यांना जफरची माहिती मिळाली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याची ओळख पटविली. तेव्हापासून विश्रामबाग पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान, जफरच्या नातेवाईकावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्यांना मदत करण्यासाठी तो शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बरुरे, अंमलदार
अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिस शेख, नितीन बाबर,सागर मोरे यांच्या पथकाने केली.या तोतया पोलिसाच्या गुन्हे करण्याच्या विविध पद्धती होत्या,मावशी मी पोलीस आहे... पुढे चोरी झाली आहे, तुमचे दागिणे माझ्याकडे द्या. तुमच्या गाडीवर गुन्हा घडला आहे किंवा या गाडीसारखी गाडी मला खरेदी करायची आहे. एक राइड मिळेल का, असे म्हणून दुचाकी लंपास करत असे. पुढे चोरी केलेल्या दुचाकीचा नंबर बदलून त्या गाडीचा वापर करून जबरी चेन, सोनसाखळी चोरी करत होता, तसेच बँकेत पैसे मोजून देतो, असे म्हणत ग्राहकांचे पैसे
हातचलाखीने काढून घेत होता.अनेक ठिकाणी अश्या घटना घडल्या आहे.
No comments:
Post a Comment